लसीकरण वाढले नाही तर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल करणार : अपर जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST2021-04-25T04:30:37+5:302021-04-25T04:30:37+5:30

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण बावा, तहसीलदार गिरीश वखारे, सहायक गटविकास ...

If vaccination is not increased, a case will be filed under Disaster Management: Additional Collector | लसीकरण वाढले नाही तर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल करणार : अपर जिल्हाधिकारी

लसीकरण वाढले नाही तर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल करणार : अपर जिल्हाधिकारी

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण बावा, तहसीलदार गिरीश वखारे, सहायक गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, न. पा. मुख्याधिकारी अनंत जवादवार, आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीत तालुक्यातील लसीकरण केंद्रे, या केंद्रानुसार लसीकरणास पात्र असलेल्या व्यक्तींची संख्या व आरोग्य विभागाची लसीकरणाबाबत कर्मचारी संख्या याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणाला अजूनही ग्रामीण भागात अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यात येणाऱ्या अडीअडचणी, गावपातळीवर लसीकरणाची जनजागृती याबाबतीत माहिती घेऊन यावर उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. शहरात वाॅर्डनिहाय लसीकरणाचे नियोजन व ग्रामीण भागात गावपातळीवर लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत संसाधने उपलब्ध करून देणे, तलाठी, ग्रामसवेक, शिक्षक, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी यांनी तालुक्यातील गावागावांत जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यातही जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असा सूर बैठकीत दिसून आला. या बैठकीत शिक्षण, आरोग्य विभागाचे अधिकारी, पं. स.चे अधिकारी, ग्रामसेवक, पर्यवेक्षक, तलाठी, मंडळ अधिकारी, आदी उपस्थित होते. या नियोजनामुळे लसीकरण कार्यक्रमाला वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

चौकट

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव अधिक वाढत असून, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाची मोहीम अधिक विस्तारित व गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागात लसीकरण आजही नगण्यच आहे, म्हणून आता शासन स्तरावर ग्रामीण भागात लसीकरण होण्यासाठी शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. शासन स्तरावर लसीकरणाचे नियोजन व अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर येत्या काळात ग्रामीण भागात कोरोनाला आटोक्यात आणणे शक्य होईल.

Web Title: If vaccination is not increased, a case will be filed under Disaster Management: Additional Collector