अभाणपूर येथे पतीने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 13:18 IST2020-08-13T13:18:18+5:302020-08-13T13:18:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : पतीस दारू पिण्यास मनाई करणाऱ्या पत्नीचा खून करणाºया पतीविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...

Husband kills wife at Abhanpur | अभाणपूर येथे पतीने केला पत्नीचा खून

अभाणपूर येथे पतीने केला पत्नीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : पतीस दारू पिण्यास मनाई करणाऱ्या पत्नीचा खून करणाºया पतीविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० रोजी रात्री ही घटना अभानपूर, ता.शहादा शिवारात घडली.
जयसिंग उर्फ जाड्या दुलबा पवार, रा.मलगाव, ता.पानसेमल असे आरोपीचे नाव आहे. तर अनिताबाई जयसिंग पवार, (३०) रा.मलगाव असे मयताचे नाव आहे. अभानपूर शिवारातील बापू मराठे यांच्या शेतात हे कुटूंब राहत होते. १० आॅगस्ट रोजी रात्री त्यांनी पत्नीचा कशाने तरी गळा दाबून खून केल्याची शक्यता आहे. याबाबत सायसिंग सिलदार भिल यांनी फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास अटक करण्यात आली आहे.
आधी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर फिर्याद दाखल झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Husband kills wife at Abhanpur