किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? विविध आदेशांमुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:09+5:302021-06-18T04:22:09+5:30

नंदुरबार : जिल्हा स्तरावर काढण्यात आलेला पहिला आदेश व नंतर संचालक स्तरावरून काढण्यात आलेल्या आदेशामुळे शिक्षक उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण ...

How many teachers want to go to school, brother? Confusion due to various commands | किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? विविध आदेशांमुळे संभ्रम

किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? विविध आदेशांमुळे संभ्रम

नंदुरबार : जिल्हा स्तरावर काढण्यात आलेला पहिला आदेश व नंतर संचालक स्तरावरून काढण्यात आलेल्या आदेशामुळे शिक्षक उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता तो संभ्रम दूर झाला असून दररोज ५० टक्के उपस्थितीचे आदेशामुळे कामकाज नियमित सुरू झाले आहे.

शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी शाळा बंद आहेत. शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितबाबत पहिल्या दिवसापासूनच शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. सर्वच शाळांमध्ये सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आदेश काढल्यानंतर शिक्षण संचालकांनी पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांनी दररोज ५० टक्के उपस्थितीत राहावे तर दहावी व बारावीच्या शिक्षकांनी दररोज १०० टक्के उपस्थित राहावे, असे आदेश आहेत. असे असले तरी जिल्हा परिषद शाळांमध्ये आधीच दोन शिक्षकी शाळा आहेत. त्यामुळे एक शिक्षकावर सर्व भार दिला जाऊ शकत नसल्याने दोन्ही शिक्षक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.

Web Title: How many teachers want to go to school, brother? Confusion due to various commands