पॅराग्लाईडिंगसाठी युवकांना खुणावताय सातपुड्याची उंच शिखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:45 IST2021-02-26T04:45:03+5:302021-02-26T04:45:03+5:30

तोरणमाळ ते धडगाव पट्टा या खेळासाठी आदर्श ठिकाण सातपुड्याच्या विस्तीर्ण भागात धडगाव तालुक्यातील तोरणमाळ ते धडगाव भागत अनेक ठिकाणी ...

The high peaks of Satpuda mark the youth for paragliding | पॅराग्लाईडिंगसाठी युवकांना खुणावताय सातपुड्याची उंच शिखरे

पॅराग्लाईडिंगसाठी युवकांना खुणावताय सातपुड्याची उंच शिखरे

तोरणमाळ ते धडगाव पट्टा या खेळासाठी आदर्श ठिकाण

सातपुड्याच्या विस्तीर्ण भागात धडगाव तालुक्यातील तोरणमाळ ते धडगाव भागत अनेक ठिकाणी उंच टेकड्या असून ज्या ठिकाणी या साहसी खेळ साठी आदर्श अशी जागा आहे. हवेचा अधिक दाब व अफाट उंची हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. कदाचित त्यामुळेच प्राप्त माहिती घेऊन ते या भागात साहसी उडीचा अनुभव घेण्यासाठी आले असावेत, असा कयास लावला जात आहे.

पर्यटन व साहसी खेळ

महाबळेश्वर, सिमला या भागात असे साहसी खेळ करण्यासाठी देशभरातील युवक येतात. त्यामुळे अशा भागात पर्यटनवाढीलाही चालना मिळाली आहे. त्यामुळे सातपुड्यातदेखील अशा खेळांना प्रोत्साहन दिल्यास, सोयीसुविधा पुरविल्यास पर्यटनाला चालना मिळू शकेल.

या खेळबद्दल माहिती

हवेचा दाब या खेळाच्या महत्त्वाचा दुवा असून हवा या खेळाची रंगत अधिक वाढवते. कसलेल्या खेळाडूंना तोल सांभाळून कौशल्य दाखवावे लागते. हवेची दिशा वेग आणि वातावरण तापमान यावर किती उंचीवर उडवायचे हे ठरवत असतो. समुद्रसपाटीपासून दीड हजार मीटर उंचावर जाता येत. दहा ते पंधरा मिनिटांचे हवेतील ही सफर घेता येते. एकट्याने पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने आकाशात उड्डाण घेणे. (सोलो फ्लाइंग), प्रशिक्षकासोबत दुसऱ्या व्यक्तीला घेऊन आकाशात उड्डाण घेणो (टॅडम फ्लाइंग) अशा दोन प्रकारचे प्रशिक्षण घेतले जाते.

Web Title: The high peaks of Satpuda mark the youth for paragliding