आरोग्य केंद्राच्या पडक्या इमारतीमुळे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:37 IST2019-07-24T11:37:35+5:302019-07-24T11:37:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील सर्वात मोठय़ा आणि उपयोगी अशा बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचा:यांसाठी बांधलेली ...

Healthy buildings fall under threat | आरोग्य केंद्राच्या पडक्या इमारतीमुळे जीव धोक्यात

आरोग्य केंद्राच्या पडक्या इमारतीमुळे जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील सर्वात मोठय़ा आणि उपयोगी अशा बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचा:यांसाठी बांधलेली निवासस्थाने जीर्ण झाली आहेत़ यामुळे याठिकाणी राहणा:यांचे जीव धोक्यात आह़े       
शहादा व तळोदा तालुक्यातील साधारण 40 च्या जवळपास गावांना सुविधा देणा:या बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कालौघात जीर्ण झाली आह़े सोबतच याठिकाणी बांधण्यात आलेली निवासस्थाने पडकी झाली आहेत़ या संपूर्ण परिसराचा कायापालट करुन नवीन आरोग्य केंद्र निर्माण करण्यासाठी एनआरएचएमअंतर्गत जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी 5 कोटी रुपयांना मंजूरी दिली होती़ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तळोदा तालुक्यातील सोमावल, बोरद आणि प्रतापपूर हे तीन तर अक्कलकुवा तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना साधारण तीन ते पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती देऊन शिक्कामोर्तब केले गेले होत़े यानंतर काही ठिकाणी कामे सुरु झाली असली तरी बोरद येथे मात्र अद्याप कोणतेही काम सुरु झालेले नसल्याने 50 वर्षापूर्वीच्या जुन्या बांधकामातच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णसेवा करत आहेत़ सध्या पावसाळा सुरु असल्याने निवास आणि केंद्राची इमारत दोन्हीही गळत असल्याचे सातत्याने दिसून येत आह़े यामुळे अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानांऐवजी बोरद आणि परिसरात खाजगी घर भाडय़ाने घेऊन राहत आहेत़ यातून रात्री अपरात्री गंभीर स्वरुपातील रुग्ण दाखल झाल्यास रुग्णांच्या नातलगांना आरोग्य विभागाच्या कर्मचा:यांचा शोध घ्यावा लागत आह़े हा प्रकार थांबवण्यासाठी घरांची तात्पुरती दुरुस्ती करुन इमारत नूतनीकरणाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी बोरद आणि परिसरातील गावांमधून होत आह़े 

तळोदा रस्त्याला लागून असलेल्या बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांना गेल्या वर्षी मंजूरी देण्यात आली होती़ यातील 30 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता़ परंतू लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निधी आणि बांधकाम सुरु करण्याबाबतचे आदेश लांबल़े आचारसंहिता संपल्यानंतर हे काम सुरु होण्याची अपेक्षा होती़ परंतू आता पुन्हा जिल्हा परिषद किंवा विधानसभा निवडणूका लागल्यास आरोग्य केंद्राचे काम सुरुच होऊ शकणार नाही़ येथील वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 आणि 2 तसेच आरोग्य कर्मचा:यांची निवासस्थाने कधी कोसळतील अशी स्थिती आह़े यात साप आणि विंचू यांचा सुळसुळाट झाल्याने आरोग्य कर्मचा:यांचे जीव धोक्यात आहेत़ निवासस्थानांच्या तात्पुरत्या दुरुस्त्या करुन राहणे शक्य असल्याने समस्या निकाली काढण्यासाठी कर्मचा:यांनी पाठपुरावा करुनही आतार्पयत कारवाई झालेली नाही़ 
 

Web Title: Healthy buildings fall under threat