शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांचे आरोग्य ‘रामभरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

नंदुरबार : कोरोनामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाने या प्रश्नावरच लक्ष केंद्रित केल्याने जिल्ह्यातील सर्वात गंभीर प्रश्न असलेल्या कुपोषित बालकांचे आरोग्य ...

नंदुरबार : कोरोनामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाने या प्रश्नावरच लक्ष केंद्रित केल्याने जिल्ह्यातील सर्वात गंभीर प्रश्न असलेल्या कुपोषित बालकांचे आरोग्य मात्र ‘रामभरोसे’ झाले आहे. अति तीव्र कुपोषित बालकांच्या उपचारासाठी स्थापन करण्यात आलेले पोषण पुनर्वसन केंद्रावरदेखील कोरोना रुग्णांच्या उपचाराची व लसीकरणाची सुविधा झाल्याने कुपोषणाचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. पावसाळ्यापूर्वी होणारे स्क्रिनिंगदेखील लांबले आहे.

राज्यातच नव्हे तर देशात नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत राहिला आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे तर हा प्रश्न सध्या बाजूला पडला आहे. गेल्यावर्षी ‘लोकमत’नेच केलेल्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे स्क्रिनिंग झाले. त्यात जवळपास साडेतीन हजारांपेक्षा अधिक अति तीव्र कुपोषित बालके आढळून आले होते. जिल्ह्यातील स्क्रिनिंग पॅटर्नचे कौतुक राज्य शासनानेही केले होते व राज्यभर ते राबविण्याचे जाहीरदेखील केले होते. पण केवळ काही जिल्ह्यातच ते राबवले गेले. यावर्षीदेखील पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे स्क्रिनिंगची प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना कोरोनाच्या नावावर अजून १५ दिवस लांबणीवर ही प्रक्रिया टाकण्यात आली आहे. प्रत्यक्षात पावसाळा सुरू झाला तर प्रक्रिया सुरू होईल की नाही तो प्रश्न अधांतरीच आहे.

एकीकडे स्क्रिनिंगबाबत बेफिकिरी असताना प्रचंड वाजागाजा करून स्थापन करण्यात आलेले पोषण पुनर्वसन केंद्रदेखील सध्या बंदच आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व मोलगी येथील पोषण केंद्र बंद अवस्थेत आहेत. त्यात अक्कलकुवा आणि धडगाव येथील केंद्रात सध्या लसीकरण सुरू आहे. तळोद्याचे केंद्र कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरले जात आहे तर मोलगी येथील केंद्रावर नियुक्तीला असलेले कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी इतर ठिकाणी पाठविण्यात आले आहे. वास्तविक नंदुरबार जिल्ह्यातील पोषण पुनर्वसन केंद्राची राज्यभर चर्चा होती. या केंद्रांचे उद्‌घाटनच मुख्यमंत्री व राज्यपालांच्या हस्ते झाले होते. सध्या जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न तीव्र आहे. गेल्यावर्षीच बालकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने प्रशासनाने उपाययोजनांसाठी यापूर्वीच दखल घेणे अपेक्षित असताना अजूनही त्याबाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे.

गेल्यावर्षी ४० टक्के बालके

राज्यात एकूण ३८ पोषण पुनर्वसन केंद्र आहेत. त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यात सहा केंद्र आहेत. राज्यातील सर्व केंद्रांवर गेल्यावर्षी जेवढी बालके दाखल होते त्यापैकी ४० टक्के बालके नंदुरबार जिल्ह्यातील पोषण केंद्रांमध्ये होते. अति तीव्र कुपोषित बालकांमधील जवळपास १० टक्क्यांपेक्षा अधिक बालकांचे आरोग्य गंभीर बनलेले असते. त्यांना या पोषण केंद्रात दाखल करून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आहार व आरोग्याची सुविधा दिली जाते.