रोटरी तर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:58 IST2020-06-08T11:58:12+5:302020-06-08T11:58:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोटरी क्लब नंदनगरीने नगरपरिषदेचे कर्मचारी व सेवा फाऊंडेशनचे सफाई कर्मचारी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य ...

Health check up of cleaning staff by Rotary | रोटरी तर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

रोटरी तर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रोटरी क्लब नंदनगरीने नगरपरिषदेचे कर्मचारी व सेवा फाऊंडेशनचे सफाई कर्मचारी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड, नंदनगरी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रितीश बांगड, प्रीतम ढंढोरे, भारत भूषण, अभियंता विशाल कांबळे आदी उपस्थित होते. आरोग्य तपासणीसाठी डॉ.गौरव तांबोळी (जसलोक हॉस्पिटल, मुंबई) व डॉ.स्वप्नील महाजन (एम.जी.एम. रुग्णालय, औरंगाबाद) उपस्थित होते. नगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांनी नंदुरबार शहरात कोरानाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वॉरियर्स म्हणून काम करीत आहेत. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले. प्रास्ताविक रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष प्रितीश बांगड यांनी केले. सूत्रसंचालन किरण दाभाडे तर आभार सचिव नागसेन पेंढारकर यांनी मानले. शिबिरासाठी रोटरी क्लब नंदनगरीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


रोटरीतर्फे घेण्यात आलेल्या या शिबिरांतर्गत दिवसभरात ४५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ हे सर्व सफाई कामगार आहेत़ त्यांच्या तपासणीनंतर डॉक्टरांकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढीच्या गोळ्या औषधींसह आरोग्यविषयक सल्लेही देण्यात आले़ येत्या रविवारी रोटरीकडून पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार असून त्यांना औषधी दिली जातील़


 

Web Title: Health check up of cleaning staff by Rotary