अक्कलकुव्यातील आरोग्य केंद्र सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:44 IST2020-04-30T12:44:31+5:302020-04-30T12:44:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील ब्रिटीश अंकुश विहिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने मंगळवारी सील केले़ दरम्यान बुधवारी ...

Health Center Seal at Akkalkuwa | अक्कलकुव्यातील आरोग्य केंद्र सील

अक्कलकुव्यातील आरोग्य केंद्र सील

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील ब्रिटीश अंकुश विहिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने मंगळवारी सील केले़ दरम्यान बुधवारी येथील आरोग्य कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय अशा ४० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या़
प्रशासनाने मंगळवारी आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थाने सील केल्यानंतर याठिकाणी पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक तैनात केले होते़ बुधवारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबिय अशा ४० जणांचे स्वॅब नमुने घेत सर्वांना क्वारंटाईन केले आहे़ या सर्वांची प्रकृती ही ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान प्रशासनाकडून इमारत सील करण्यात आल्यानंतर लगतच्या परिसरातून कोणी आत येणार नाही आणि बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे़ संबधित चालकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़ चालकासह त्याच्या कुटूंबातील प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे़ अंकुश विहिरसह अक्कलकुवा शहरातील फेमस चौक परिसरात जाहिर करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये कार्यरत १४ पथकांनी तपासण्या पूर्ण केल्या आहेत़ या परिसरातील १ हजार ९ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्याची माहिती आहे़ या तपासण्यांचा अहवाल आरोग्य विभागाकडे देण्यात आला आहे़

Web Title: Health Center Seal at Akkalkuwa