तळोद्यातील ठाणेदार गल्लीत रंगलेला जुगाराचा डाव हवालदारांनी केला उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:27 IST2020-04-15T12:27:44+5:302020-04-15T12:27:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीत रंगलेल्या जुगाराचा डावावर पोलीसांनी धाड टाकत पाच जणांवर कारवाई करुन ...

Havaldar demolished the gambling in the Thanedar street in Talod | तळोद्यातील ठाणेदार गल्लीत रंगलेला जुगाराचा डाव हवालदारांनी केला उध्वस्त

तळोद्यातील ठाणेदार गल्लीत रंगलेला जुगाराचा डाव हवालदारांनी केला उध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीत रंगलेल्या जुगाराचा डावावर पोलीसांनी धाड टाकत पाच जणांवर कारवाई करुन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला़ लॉकडाऊन काळात जुगाराचा डाव खेळणाऱ्या या महाभागांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तळोदा शहरातील भवर ठाणेदार गल्लीलगत असलेल्या शेतात जुगार सुरु असल्याची माहिती तळोदा पोलीसांना मिळाली होती़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी घोषित असताना हा जुगार सुरु असल्याने पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास येथे धाड टाकली होती़ यावेळी त्याठिकाणी अशोक गोविंद ठाकरे, दिपक मोतीलाल चौधरी, मोहन नामदेव पाटील, मधुकर तारांचद महाले सर्व रा़ ठाणेदार गल्ली व राज मोहन चौधरी रा ब्राह्मणगल्ली हे पाच जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले़ पोलीसांनी घटनास्थळावरुन ४ मोबाईल, २ मोटारसायकल व रोख रक्कम असा १ लाख ७७ हजार ५६५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे़ याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाडवी यांनी सोमवारी रात्री उशिरा तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक ठाकरे, दिपक चौधरी, मोहन पाटील, मधुकर महाले, राज चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत़
सर्व पाच संशयितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Havaldar demolished the gambling in the Thanedar street in Talod