शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून खरेदी करुन आणलेला 12 लाखांचा गुटखा एलसीबीच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील दोंडाईचा रस्त्यावर सुमारे १२ लाख रुपये किमतीचा गुटका पाच लाखांच्या वाहनासह एलसीबीच्या पथकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील दोंडाईचा रस्त्यावर सुमारे १२ लाख रुपये किमतीचा गुटका पाच लाखांच्या वाहनासह एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला. या कारवाईमुळे शहादा शहर व तालुक्यातून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक व विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांची माहिती तसेच नंदुरबार पोलीस अभिलेखावरील फरार आरोपींचा शोध घेत असताना एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला पाठवून शहादा-दोंडाईचा रस्त्यावर सापळा रचला होता. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रिलायन्स पेट्रोलपंप परिसरातून एमएच ०५ आर ७८४७ हे वाहन आले असता, त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार समाेर आला. हा गुटखा गुजरात राज्यातील निझर मार्गाने आणला जात होता. वाहनातून १२ लाख ९ हजार ४७२ रुपयांचा गुटका जप्त करण्यात आला. ही कारवाई एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गोरे, किरण पावरा, विकास कापुरे, विजय देवरे, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांनी केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास अजगे यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक मंगल रघुनाथ कोळी, रा. महादेवपुरा, दोंडाईचा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून १२ लाख रुपयांचा गुटखा आणि पाच लाखांचे वाहन असा तब्बन १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमुळे गुजरातमधून चोरटी वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.