गुजरातमधून खरेदी करुन आणलेला 12 लाखांचा गुटखा एलसीबीच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:00 IST2021-02-03T13:00:04+5:302021-02-03T13:00:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील दोंडाईचा रस्त्यावर सुमारे १२ लाख रुपये किमतीचा गुटका पाच लाखांच्या वाहनासह एलसीबीच्या पथकाने ...

Gutkha worth Rs 12 lakh procured from Gujarat in LCB's possession | गुजरातमधून खरेदी करुन आणलेला 12 लाखांचा गुटखा एलसीबीच्या ताब्यात

गुजरातमधून खरेदी करुन आणलेला 12 लाखांचा गुटखा एलसीबीच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील दोंडाईचा रस्त्यावर सुमारे १२ लाख रुपये किमतीचा गुटका पाच लाखांच्या वाहनासह एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला. या कारवाईमुळे शहादा शहर व तालुक्यातून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक व विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांची माहिती तसेच नंदुरबार पोलीस अभिलेखावरील फरार आरोपींचा शोध घेत असताना एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला पाठवून शहादा-दोंडाईचा रस्त्यावर सापळा रचला होता. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रिलायन्स पेट्रोलपंप परिसरातून एमएच ०५ आर ७८४७ हे वाहन आले असता, त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार समाेर आला. हा गुटखा गुजरात राज्यातील निझर मार्गाने आणला जात होता. वाहनातून १२ लाख ९ हजार ४७२ रुपयांचा गुटका जप्त करण्यात आला. ही कारवाई एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गोरे, किरण पावरा, विकास कापुरे, विजय देवरे, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांनी केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास अजगे यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक मंगल रघुनाथ कोळी, रा. महादेवपुरा, दोंडाईचा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून १२ लाख रुपयांचा गुटखा आणि पाच लाखांचे वाहन असा तब्बन १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमुळे गुजरातमधून चोरटी वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: Gutkha worth Rs 12 lakh procured from Gujarat in LCB's possession