वाघाळे केंद्राच्या शिक्षण परिषदेत विविध विषयांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:28+5:302021-04-01T04:31:28+5:30

आष्टे : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांनी दिलेल्या नियोजनानुसार ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत वाघाळे ...

Guidance on various topics in the Education Conference of Waghale Center | वाघाळे केंद्राच्या शिक्षण परिषदेत विविध विषयांवर मार्गदर्शन

वाघाळे केंद्राच्या शिक्षण परिषदेत विविध विषयांवर मार्गदर्शन

आष्टे : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांनी दिलेल्या नियोजनानुसार ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत वाघाळे केंद्राची शिक्षण परिषद ऑनलाईन घेण्यात आली.

नंदुरबार तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी डॉ.राहुल चौधरी व आष्टे बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वाघाळे केंद्राचे केंद्रप्रमुख पी.एस. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानप्रकाश संस्थेचे प्रतिनिधी रविकांत ठाकरे, पदोनत्ती मुख्याध्यापिका सुखमा कांबळे, सीताबाई चौरे, कमल वाघ, लोटन बाविस्कर, संजय देवरे, भिका सोनवणे, रावसाहेब पाटील, अर्जुन सोनवणे, पाचिराम गावीत, ताराचंद पवार उपस्थित होते. शिक्षण परिषदेत केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा व आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

शिक्षण परिषदेत पद्माकर कदम, चुडामण गरदरे, प्रवीण पगारे, गीतांजली भोई, हेमलता डोंगरे यांनी विविध विषयांवर माहिती दिली. तर केंद्रप्रमुख पी.एस. पाटील यांनी प्रशासकीय बाबींवर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून विविध प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रवीण पगारे तर आभार संजीवनी नांद्रे यांनी मानले.

Web Title: Guidance on various topics in the Education Conference of Waghale Center