शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रजाळे येथे अतिसार पंधरवाडा विषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

अध्यक्षस्थानी सरपंच रेखा पाटील, पोलीस पाटील वंदना पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी जमलेल्या सर्व पालकांना अंगणवाडी सेविका सपना पाटील यांनी ...

अध्यक्षस्थानी सरपंच रेखा पाटील, पोलीस पाटील वंदना पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी जमलेल्या सर्व पालकांना अंगणवाडी सेविका सपना पाटील यांनी अतिसार पंधरवाडा नियंत्रण कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. या वेळी अंगणवाडी सेविका पाटील यांनी महिलांना १५ ते ३० जुलै या पंधरवड्यात अतिसाराची लागण होऊ नये म्हणून लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी. तसेच आपल्या परिसरात स्वच्छता राखावी, वैयक्तिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे तसेच पाणी उकळून पिण्याविषयी माहिती देऊन उपस्थित महिलांना जनजागृती केली. तसेच शून्य ते सहा वर्ष बालकांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते, अशा बालकांची विशेष काळजी घेण्याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गरोदर मातांनी वेळेवर आहार घ्यावा व लहान बालकांची ही काळजी घ्यावी. वेळेवर आहार देण्यात यावा या विषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका छाया पाटील यांनी उपस्थित महिलांना गाण्याच्या माध्यमातून जेवणाच्या आधी साबणाने स्वच्छ हात धुवावे, तसेच कोरोना नियमांचेही पालन करावे आदींबाबत जनजागृती केली. कार्यक्रमाप्रसंगी गरोदर मातांना सरपंच रेखा पाटील यांच्या हस्ते बेबी किटचे वाटप करण्यात आले. तसेच नयना मंगा भिल व कनिका खुशाल पाटील या दोन्ही चिमुकलीचा अर्धवार्षिक वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस अंगणवाडी केंद्रात मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी मदतनीस साधना पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावातील गरोदर माता, स्तनदा माता व शून्य ते सहा वर्ष बालकांच्या माता मोठ्या संख्येने उपस्थित होते.