सोशल डिस्टन्सिंग पाळून महाराणा प्रतापांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:57 AM2020-05-26T11:57:26+5:302020-05-26T11:58:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. सोशल ...

Greetings to Maharana Pratap by observing social distance | सोशल डिस्टन्सिंग पाळून महाराणा प्रतापांना अभिवादन

सोशल डिस्टन्सिंग पाळून महाराणा प्रतापांना अभिवादन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले़
यावेळी योगेश राजपूत, समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, उपाध्यक्ष दिनेश राजपूत, उपविभागीय पोलीस अधीक्षक रमेश पवार, मंडळाचे अध्यक्ष वाल्मिकसिंह राजपूत, रणजीत राजपूत, मुकेश राजपूत, संग्रामसिंह राजपूत, दिग्विजय राजपूत, अ‍ॅड़ अविनाश राजपूत, योगेश राजपूत, प्रतापसिंह राजपूत, भूषण राजपूत, मोहनसिंग राजपूत, बापुराव राजपूत, बलदेवसिंह राजपूत, चुडामण राजपूत, बाला राजपूत यांनी महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले़
प्रास्ताविकात प्रविण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महाराणा प्रताप जयंती साजरी केली जाते़ परंतू सध्या कोविड १९ मुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ साध्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले़ कार्यक्रमास समाजबांधव सोशल डिस्टन्सिंग पाळून सहभागी होते़

Web Title: Greetings to Maharana Pratap by observing social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.