शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खापर गावाजवळ कंटेनरमध्ये आढळली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर :  गुजरात राज्यातून अवैध पणे गुरे वाहून नेणारा कंटेनर खापर गावाजव शेवाळी-नेत्रंग महामार्गावर पोलिसांनी पाठलाग ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर :  गुजरात राज्यातून अवैध पणे गुरे वाहून नेणारा कंटेनर खापर गावाजव शेवाळी-नेत्रंग महामार्गावर पोलिसांनी पाठलाग करुन पकडल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  पाठलाग सुरू असल्याचे पाहून वाहनचालक वाहन सोडून फरार झाला.गुजरात राज्यातील सागबारा येथे गुजरात राज्याचे जीएसटी पथक वाहनांची तपासणी करत असताना गुरे भरलेला यूपी-२१-एएन ५३८६ पथकाची नजर चुकवत भरधाव वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने निघाला होता. ही माहिती सागबारा पोलीसांनी तातडीने अक्कलकुवा पोलीसांना कळवली होती. त्यानुसार अक्कलकुवा पोलीस ठाण्यांतर्गत खापर औट पोस्टच्या कर्मचा-यांनी खापर शिवारात कंटेनर आल्यानंतर पाठलाग सुरू केला होता. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालक व क्लिनर या दोघांनी कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा करत पळ काढला होता. पोलीसांनी कंटेनर उघडून पाहिला असता त्यात ६४ कोंबून कोंबून भरलेली असल्याचे आढळून आले. यातील सहा जनावरे ही मृतावस्थेत होती. कंटेनरमध्ये ८ गायी, १२ मादी वासरु, ९ बैल व ३५ नर वासरु अशी ६४ जनावरे होती. यातील २ बैल, २ गायी व २ नर वासरांचा मृत्यू झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. इतर जनावरांना येथील गोशाळेत पाठवण्यात आले. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक विजय विसावे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चालकाविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद वळवी, पोलीस हेड काॅन्स्टेबल मोहन शिरसाठ, अंकुश गावीत, संजय सुर्यवंशी, निलेश वसावे, सतिष वळवी यांनी ही कारवाई केली. पोलीसांनी १२ लाख रूपयांचा कंटेनर व पाच लाख ५२ हजार रूपयांची गुरे असा एकूण १७ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक अरविंद वळवी करत आहेत. फरार झालेला कंटेनर चालक व मालक यांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती आली आहे.