शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील ग्रामपंचायतीनी लाॅकडाऊनमधील विवाह नोंदणीला दिली तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

बामखेडा : विवाह नोंदणी अत्यावश्यक असताना अद्यापही बहुतांश नागरिक याबाबतीत उदासीन आहेत. दर वर्षी होणारे विवाह आणि त्यांची शासकीय ...

बामखेडा : विवाह नोंदणी अत्यावश्यक असताना अद्यापही बहुतांश नागरिक याबाबतीत उदासीन आहेत. दर वर्षी होणारे विवाह आणि त्यांची शासकीय दप्तरी होणारी नोंदणी याची आकडेवारी निराशाजनक आहे. वैवाहिक दाम्पत्य व कुटुंबातील सदस्य विवाह नोंदणीला फारसे महत्त्व देत नाहीत. स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे कुटुंब याला अपवाद नाहीत. जे काही जागृत नागरिक होते त्यांनीही या कोरोनाच्या संचारबंदीत विवाह नोंदणीला अपवाद वगळता तिलांजली दिल्याचे चित्र आहे. यात प्रशासनाला देखील स्वारस्य दिसत नाही. विवाह नोंदणी महत्वाची असताना नागरिक आणि प्रशासन दोन्हीही घटक याबाबतीत उदासीन आहेत. विवाह नोंदणी करण्याविषयी जागरूकता आवश्यक आहे.

विवाह नोंदणी करणे ही बाब कायद्यानुसार बंधनकारक आहे. विशेष म्हणजे विवाह नोंदणी करीता सोयीचे व्हावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायत मध्येच ठरवून दिलेले पुरावे सादर करीत विवाह नोंदणी करणे कायद्याने अनिवार्य आसताना कोरोनातील लाॅकडाऊनमध्ये जमाव बंदी आसताना सुध्दा अनेक विवाह झाले. परंतु पुराव्याअभावी विवाह नोंदणीला तिलांजली दिल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. सन २०१९ मध्ये तालुक्यातील झालेल्या विवाहाच्या काही नोंदी पंचायत समितीकडे आल्या. तर सन २०२० मध्ये झालेल्या विवाहांपैकी एकाही विवाहाची नोंद पंचायत समितीकडे आलेली नाही. याप्रकरणी संबंधित प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आसल्याचे बोलो जात आहे.

कोरोणा विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाबीवर लाॅकडाऊन घोषीत केला होता. ही संचारबंदी ऐन लग्न समारंभाच्या दिवसामध्ये आल्याने अनेक उपवर वर-वधूंकडील कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली. परंतु प्रशासनाने पुढे टप्प्या टप्पाने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आणि ५० व्यक्तींच्या समुहाला लाॅकडाऊनचे नियम पाळत विवाह-समारंभाला सवलत दिली.

या दरम्यान मोठ्या प्रमाणात अनेक गावामध्ये लाॅकडाऊनचे ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवित मोठ्या जोमाने विविह-समारंभ साजरे झाले. परंतु स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत विवाह नोंदणीला मोठ्या प्रमाणात तिलांजली दिल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विवाह नोंदणी करावयाची असल्यास प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार विवाह नोंदणी करीता.

मुद्रांक पेपरवर घोषणापत्र, वर-वधूचे आधार कार्ड, शाळेचा दाखला, वर-वधू यांचे वय अनुक्रमे २१ व १८ आणि विवाहाची लग्न पत्रिका अनिवार्य आहे. परंतु लाॅकडाऊन दरम्यान जेवढे विवाह झाले. त्यापैकी बहुतांश विवाह हे लग्ण पत्रिकाविनाच पार पाडल्या गेल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील विवाह नोंदणी करीता मुख्य अडसर हा लग्न पत्रिकांचा येत आसल्याने लाॅकडाऊन दरम्यान झालेल्या विवाह नोंदणीला तिलांजली मिळाल्याचे दिसून येत आहे.

बाल विवाहाचे भिजत घोंगडे कायम

ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही वधूचे वय वर्षे १८ होण्याआधीच विवाह उरकला जात आहे. अशा विवाहाची नोंदणी करणे ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक टाळले जाते. हि बाब स्थानिक प्रशासनाला माहिती असताना सुध्दा स्थानिक प्रशासन मूगगिळून गप्प बसते. आशामुळे प्रशासनाच्या धोरणाला खीळ बसत आसल्याचे बोलले जाते.

एकच पत्रिका छापण्याची आता होते घाई

ग्रामपंचायतमध्ये विवाहाच्या नोंदणी करण्यासाठी लग्नपत्रिका महत्वाची धरली जाते. परंतु लाॅकडाऊन दरम्यान झालेल्या बहुतांश विवाहधारकांनी लग्न पत्रिकाच छापल्या नसल्याने हल्ली एक लग्न पत्रिका छापण्या करीता हजार रूपयापर्यंत रक्कम आकारली जात आहे. यामुळे छपाईधारकांना थोडे फार सुगीचे दिवस आलेले आहेत.