शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. निवडणुकीची शहरी भागात उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर ग्रामिण भागात असला तरी शहरी भागात देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर ग्रामिण भागात असला तरी शहरी भागात देखील त्याची मोठी उत्सूकता लागून आहे. शहरी भागातील नातेवाईक, आप्तेष्ठ निवडणुकांची वेळोवेळी माहिती घेत असल्याचे चित्र आहे.जि.प. व पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. छाननीनंतर बहुतेक ठिकाणच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. माघारीअंती किती उमेदवार कुठल्या गटात, गणात आहेत हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी ग्रामिण भागात सध्या विविध घडामोडींना वेग आला आहे.गावागावात बैठका जोर धरू लागल्या आहेत. नातेवाईक उमेदवारांना भेटण्यासाठी जात आहेत. ही बाब लक्षात घेता शहरी भागातील मतदारांना या निवडणुकींची मोठी उत्सूकता लागली आहे. दैनंदिन घडामोडी काय घडतात याकडे शहरवासी लक्ष देवून आहेत.नंदुरबार शहराचा विचार करता शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. लगतच्या वस्ती या ग्रामिण भागात अर्थात पातोंडा, होळ, वाघोदा, करजकुपे, टोकरतलाव, दुधाळे, चौपाळे, भोणे या गावांच्या हद्दीमध्ये आहेत. ही गावे विविध गट व गणाअंतर्गत येतात. त्यामुळे या भागातील शहरवासी हे त्या ठिकाणचे मतदार देखील आहेत. त्यांचे मतदान देखील निर्णायक राहणार आहे. ही बाब लक्षात घेता शहरवासीयांमध्ये या निवडणुकीची उत्सूकता ताणली गेली आहे.नंदुरबार शहरासह तळोदा, नवापूर, शहादा व धडगाव ही नगरपालिका व नगर पंचायतीअंतर्गत येतात. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रक्रियेत ही शहरे नाहीत परिणामी तेथील शहरवासीयांना निवडणुकीची उत्सूकता कायम आहे.अनेक कुटूंब हे गावातून शहरात राहण्यासाठी आले आहेत. कुणी नोकरीनिमित्त तर कुणी मुलांच्या शिक्षणासाठी येथे आलेले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना या निवडणुकीची मोठी उत्सूकता आहे. नातेवाईकांना याबाबत माहिती विचारली जात आहे. सध्या बऱ्याच शाळांना नाताळच्या सुट्टया असल्यामुळे अनेक कुटूंबे गावी गेलेली असून तेथे आपल्या नात्यातील उमेदवाराच्या प्रचारात ते गुंतले असल्याचे दिसून येत आहे.