जामलीवासियांची पाण्यासाठी वणवण

By Admin | Updated: June 1, 2017 13:42 IST2017-06-01T13:42:24+5:302017-06-01T13:42:24+5:30

समस्या निकाली काढण्याची मागणी : गावातील दोन्ही हातपंप झाले कोरडे

Garner water distribution | जामलीवासियांची पाण्यासाठी वणवण

जामलीवासियांची पाण्यासाठी वणवण

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.1 - अक्कलकुवा तालुक्यातील जामलीच्या पाटीलपाडा उमर्टीरोड येथे गेल्या दोन वर्षापासून भिषण पाणीटंचाई आह़े केवळ हातपंप नादुरूस्त असल्याने निर्माण झालेली ही टंचाई  आजही कायम आह़े सातपुडय़ाच्या अती दुर्गम भागातील या गावात पाणी यावे म्हणून ग्रामस्थांना निवेदने घेऊन वणवण भटकत आहेत़    
अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ग्रामपंचायत समाविष्ट असलेल्या जामली (पाटीलपाडा) व भगतपाडा या दोन पाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याचे जादा स्त्रोत नसल्याने ही समस्या ओढावली आह़े भांगरापाणी येथून पाणी योजना पुढे विस्तारीत करणे शक्य नसल्याने या पाडय़ांसाठी नवे हातपंप किंवा पाणी योजना सुरू करण्याची गरज आह़े जानेवारी महिन्यापासून उंचसखल भाग असल्याने भूजल खालावत असल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू होत आह़े 

Web Title: Garner water distribution