शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

गडदाणीला दोन बिबट्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर / विसरवाडी :  तालुक्यातील चिंचपाड्याच्या वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची निर्घुणपणे शिकार करण्यात आल्याचे आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर / विसरवाडी :  तालुक्यातील चिंचपाड्याच्या वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची निर्घुणपणे शिकार करण्यात आल्याचे आढळून आले. या वेळी मेलेल्या पशुंच्या मासमध्ये विषप्रयोग करुन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याचा संशय वनविभागाला आहे. याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. शिकारीनंतर या दोन्ही बिबट्यांचे मोठे दात, मिश्या त्यांचे चारही पंजे कापून काढण्यात आलेले आहेत.बिबट्याचे अवशेष दोन संशयित आरोपीचा घरात आढळून आले. या प्रकरणी अजूनही काही बिबट्यांची शिकार झाली आहे का? याचा शोध वनविभागाकडून केला जात आहे. त्यासाठी विशेष शोधमोहीम विसरवाडी पोलिसांच्या मदतीने राबवली जात आहे. द्वेष भावनेतून या दोन्ही बिबट्यांची शिकार केल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.एक सात वर्षीय बिबट्या १५ दिवसापूर्वी मारून बिबट्याला जमिनीत पुरविण्यात आले होते. त्यांला रविवारी बाहेर काढले असता कुजलेल्या अवस्थेत सांगाडा मिळून आला. यासंदर्भात वनविभागाने चार संशयितांची धरपकड करण्यात आली आहे. त्यावर रविवारी घटनास्थळी पंचनामा करून अंतिम संस्कार करण्यात आले. संशयित आरोपीकडून चौकशी केली असता दुसरा बिबट्या मृतक अवस्थेत जमिनीत पुरला असल्याची माहिती समोर आली. या बिबट्याचे चारही पंजे तोडलेले दिसून आले. या बिबट्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढून त्याचा पशुधन व महसूल कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करून अग्निदाग देण्यात आला.  तिसराही बिबट्या मेलेला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. परंतु वनविभागाला तिसरा बिबट्या मिळून आला नाही. दोन बिबटे मेल्याची माहिती दिली आहे. याबाबत वन विभागाने शोध  मोहीम सुरू केली असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला की, शिकाराने हे अजून कळू शकेल नाही, अशी माहिती वनअधिकारी आर.बी. पवार यांनी दिली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करून अहवाल आल्यावर निष्पण होईल असे सांगितले. यासंदर्भात काल सहा संशयित आरोपीची धरपकड करण्यात आली.नवापूर तालुक्यातील गडदाणीच्या जंगलात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. या बिबट्यांनी अनेक पशुधन फस्त केल्याची माहिती स्थानिकानी दिली. तसेच काही लोकांनी मेलेल्या पशुच्या मासमध्ये विषारी औषध टाकून बिबट्यांना मारण्यात  आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  यासंदर्भात उप वनसंरक्षक सुरेश कवटे, सहायक वनसंरक्षक डी.जी. पवार, वनक्षेत्रपाल चिंचपाडा आर.बी. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पशुधन अधिकारी डॉ.योगेश गावीत, मंडळधिकारी बी.एन. सोनवणे, तलाठी जी.एस. तडवी, नवापूर, चिंचपाडा, शहादा, नंदुरबार वनविभागाचे ५० हून अधिक कर्मचारीवर्ग घटनास्थळी दाखल  होते. वन विभागाची जंगलात शोध मोहीम सुरू आहे. वन्य जीव, वन्य प्राण्यांचा सुरक्षिततेसाठी नवापूर तालुक्यातील नवापूर व चिंचपाडा वन विभागाने जंगलात गस्त घालण्याची गरज आहे.