शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी येथे जी. एस. विद्यामंदिर व ग्रामपंचायतीचा जनजागृती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

नंदुरबार जिल्हा हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. जास्तीत - जास्त संख्येने लसीकरण व्हावे, याकरिता अनेक ठिकाणी ...

नंदुरबार जिल्हा हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. जास्तीत - जास्त संख्येने लसीकरण व्हावे, याकरिता अनेक ठिकाणी जनजागृती केली जात आहे. अशीच जनजागृती शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी लि. शहादा संचलित जी.एस.विद्यामंदिर वडाळी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी वडाळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ‘करूया जनजागर लसीकरणाचा’ हा जनजागृती उपक्रम राबविला.

वडाळी गावाने कोरोना मुक्तीकडे वाटचाल केली असून गावातील शासकीय, निमशासकीय आस्थापना यांचा योग्य समन्वय, नागरिकांचे सहकार्य यामुळे गावात ४५ ते ६० वर्षांवरील नागरिकांचे जवळपास सुमारे ८० टक्के लसीकरण झाले आहे. उर्वरीत लसीकरणासाठी घरोघरी लसीकरणाची वारी केल्याशिवाय पर्याय नाही, असे दिसून आल्यावर जी. एस. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अंबालाल पाटील, पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी, ग्रामपंचायत पदाधिकारी, दिनेश पाटील यांच्या विशेष संकल्पनेतून शिक्षकांनी जर आदिवासी पेहराव धारण करून आदिवासी बोलीभाषेत पारंपरिक संस्कृती जपत आदिवासी वाद्यासहित जर लसीकरण जनजागृती केली तर लोकांची मनातील भीती व अफवा दूर होऊन वडाळी गावात १०० टक्के लसीकरण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. म्हणून, प्रत्यक्ष शिक्षकांनी होळी सणाच्या वेळेस घातले जाणारे पारंपरिक आदिवासी वस्त्र परिधान केले व गावातील प्रत्येक चौकात पथनाट्य सादर करून ‘लस ले ताई कोरोना पई जाई’, ‘घाबरू नको ताई लस लेवा शिवाय आते ईलाज नाई’, ‘जरी नई काय दुखत तरी लस ल्या फुकट’, अशा सूचना देत लोकांना आवाहन केले. प्रांताधिकारी चेतन गिरासे यांनी स्वत: रॅलीमध्ये सहभाग घेत जनतेला लसीकरणाचे आवाहन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मनिलाल शेल्टे, मंडळाधिकारी साळवे, सरपंच जामसिंग भिल, पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी, ग्रामविस्तार अधिकारी बी. बी. देसले यांनीही जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन करत कला पथकाचे कौतुक केले. दरम्यान, राहिलेल्या लोकांनीदेखील आम्ही लसीकरणाला जाऊच असे आश्वासन दिले.

जी.एस.विद्यामंदिरातील शिक्षकांचा व ग्रामपंचायत प्रशासनाचा लसीकरणासंदर्भात भीती व अफवा दूर करण्यासाठीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे गावातील लसीकरणाचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल. - चेतन गिरासे, उपविभागीय अधिकारी, शहादा विभाग

आदिवासी संस्कृती जपत आपण जर आदिवासी वस्त्र परिधान करून बोलीभाषेतच जनजागर केला तर तो प्रभावी ठरू शकतो. यामुळे ही संकल्पना राबविली असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. - अंबालाल पाटील, मुख्याध्यापक जी. एस. विद्यामंदिर, वडाळी.