पाण्याच्या काटकसरीतच भवितव्य सुखावह असा जलजीवन मिशन उपक्रमात संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:18 PM2020-02-16T13:18:17+5:302020-02-16T13:18:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पाण्याची काटकसर करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याचा थेंब न् थेंब वाचवले तरच भवितव्य ...

The future of the water is just fine | पाण्याच्या काटकसरीतच भवितव्य सुखावह असा जलजीवन मिशन उपक्रमात संदेश

पाण्याच्या काटकसरीतच भवितव्य सुखावह असा जलजीवन मिशन उपक्रमात संदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : पाण्याची काटकसर करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याचा थेंब न् थेंब वाचवले तरच भवितव्य सुखात जीवन जगता येईल, असा संदेश जिल्हा परिषदेमार्फत हाती घेण्यात आलेल्या जलजीवन मिशन या उपक्रमातून दिला जात आहे.
जलजीवन उपक्रमांतर्गत तळोदा येथे सरपंच व ग्रामसेवकांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पंचायत समितीचे उपसभापती लताबाई वळवी, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.बी.सोनवणे, नितीन पाटील, युवराज सुर्यवंशी, योगेश कोळपकर, तुषार देवरे, विशाल परदेशी आदी उपस्थित होते. दरम्यान गटविकास अधिकारी खर्डे यांनी पाणी बचतीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.
देश विकासाची पहिली पातळी ठरणाऱ्या ग्रामपंचायतीसाठीच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पातळीवर पाणी बचतीसाठी जनजागृती करण्यासाठी भर दिल्यास पाण्याबाबत जनजागृतीचा अपेक्षित निकाल मिळू शकतो. म्हणूनच याची सुरुवात गावापासून करण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी जनजागृती करतांना पाणी पुरवठा योजना, सांडपाण्याचे नियोजन, शोषखड्डे, बंदिस्त गटारी या बाबींवरही मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबीरात नितीन पाटील, युवराज सुर्यवंशी, योगेश कोळपकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The future of the water is just fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.