शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या नुकसानीवर साडेसोळा कोटींची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते आॅक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरामुळे शेतपिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै ते आॅक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरामुळे शेतपिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या आणि पिकासाठी कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यासाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १६ कोटी ५६ लाख ६१ हजार ५०० रुपये प्राप्त झाले आहेत. दुसरा टप्पाही तेव्हढ्याच रक्कमेचा येणार आहे. अर्थात एकुण ३३ कोटी १३ लाख २३ हजार रुपये जिल्ह्याला मदतनिधी मिळणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील तहसीलदारांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रथम टप्प्यात ही रक्कम बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्यात आली आहे. दुसºया टप्प्यात एवढीच रक्कम प्राप्त होणार आहे.नंदुरबार तालुक्यासाठी चार कोटी ६९ लाख ३३ हजार ५००, नवापूर ५३ लाख ७१ हजार ५००, शहादा सहा कोटी ९९ लाख ५२ हजार ५००, तळोदा दोन कोटी ७६ लाख १२ हजार, अक्कलकुवा एक कोटी ३६ लाख चार हजार आणि अक्राणी तालुक्यासाठी ५४ लाख २८ हजार निधी प्राप्त झाला आहे.ही मदत शेती किंवा बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता ३३ टक्के अथवा त्याहून अधिक झालेल्या नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील. नुकसानीच्या पंचनाम्यानुसार आणि त्या त्या तालुक्यातील तहसीलदार यांनी दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.संबंधित बाधिताच्या बँक खात्यावर मदत जमा करण्यात येईल. कोणत्याही बाधितांना रोखीने मदतीचे वाटप करण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.

 

  • आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नंदुरबार तालुक्यातील २८२ हेक्टर, नवापूर ३,९१८ हेक्टर, अक्कलकुवा २,५९९ हेक्टर, शहादा १,१९० हेक्टर, तळोदा १२५ हेक्टर आणि अक्राणी तालुक्यात ३,१२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात जिरायती व फळपिके सोडून इतर बागायती पिकांचा समावेश आहे. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे.
  • सप्टेंबर महिन्यात झालेला सततचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ८,२३४ शेतकऱ्यांच्या शेतात ४,३६४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.
  • प्राथमिक अहवालानुसार नंदुरबार तालुक्यात १,१७० शेतकºयांचे ९८५ हेक्टर, नवापूर ५,१२३ शेतकºयांचे १,८२८ हेक्टर, अक्कलकुवा २१० शेतकºयांचे ६० हेक्टर, शहादा ३५१ शेतकºयांचे २६१ हेक्टर आणि अक्राणी तालुक्यात १,३८० शेतकºयांच्या १,२३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
  • नुकसानग्रस्तांना मदतीसाठी सात कोटी ७५ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात पावसामुळे जिल्ह्यातील २६ हजार ४६१ शेतकºयांकडील ११ हजार २४२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
  •  

गेल्या वर्षाची नुकसानीची मदत प्राप्त झाली आहे. यंदाच्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले होते. त्यानुसार आॅगस्ट महिन्याचे झाले. आता सप्टेबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे झाले असून शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.-राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.