शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्काराची सेवा ही कृतकृत्यतेची भावना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाला इतर लोक तर सोडा नातेवाईकदेखील हात लावण्यास धजावत होते. तेथे कोरोनाने मृत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाला इतर लोक तर सोडा नातेवाईकदेखील हात लावण्यास धजावत होते. तेथे कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी एक आव्हानच होते. सुरुवातीच्या काळात यासंदर्भातील राज्यात, देशात आणि जगातही खूप नवीन किस्से गाजले. अशा स्थितीत किमान आपल्या जिल्ह्यात तरी कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीवर शेवटचा अंत्यसंस्काराचा विधीसाठी हाल अपेष्टा होवू नये याकरीता आपण नंदुरबार पालिकेच्या पुढाकाराने उपक्रम सुरू केला. तो आज तागायत सुरु आहे. हे कार्य कृत कृत्याच्या भावनेतूनच सुरू असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

या कार्यात कुठल्या अडचणी आल्या?

कोरोनाचा रुग्ण आढळला म्हणजे सुरूवातीच्या काळात त्यापासून सर्वच लांब पळत होते. तेथे कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी लोक कुठून मिळतील हा प्रश्न होता. यासंदर्भात नंदुरबार पालिकेत नियमित या सेवेच्या कामावर असलेल्या संबंधितांनी नकार दिला होता. त्यामुळे आपण पालिकेच्या जुन्या स्मशान भूमित कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाहेरील लोकांचा शोध घेवून त्यांना स्वत: मानधन देण्याचे ठरविले. त्यांच्यासाठी व मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी चांगल्या दर्जाचे पीपीई कीट उपलब्ध केले. स्वतंत्र शववाहिका दिली आणि काम सुरू केले. सुरुवातीला निश्चितच अडचणी येत गेल्या. पण वेळेनुसार त्या दूर झाल्या आणि ही सेवा अविरत सुरू राहिली. या सेवेसाठी जे लोक नियुक्त केले आहेत. ते निश्चितच चांगली सेवा देत असून, अद्यापपर्यंत कोणाही विरोधात तक्रार आलेली नाही. काही जणांनी आपल्या गावी मृतदेह नेण्याचे विनंती केली. त्यांच्यासाठी त्यांच्या गावापर्यंत शववाहिका पाठवून ही यंत्रणा सेवा देत आहे.

काेराेना रूग्णांचे हाल होऊ नये

कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने रूग्णालयांमध्ये रूग्णांचे खरोखरच हाल होताहेत. आपण त्यासाठी सवलतीच्या दरात रेमडिसिवरच्या इन्जेक्शनची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र पालिकेतर्फे देखील शहरातील रूग्णालयांमध्ये रूग्णांचे हाल होऊ नये यासाठी पथक नेमून उपाययोजना करण्याचे नियोजन आहे.

अंत्यसंस्कार करणाऱ्या पथकाला स्वखर्चातून मानधन

नंदुरबार पालिकेतर्फे कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तिचा अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरु आहे. यासाठी बाहेरील पथक नियुक्त केले असून, त्यांना प्रति अंत्यसंस्कारासाठी दोन हजार रूपयांचा मानधनाचा खर्च स्वत: चंद्रकांत रघुवंशी हे करीत आहेत. यासाठी एक शववाहिका असून, पुन्हा दुसरी शववाहिकादेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन ॲम्ब्युलन्स सेवादेखील सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांवर नंदुरबार पालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यासाठी सेवा देणारे कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. -चंद्रकांत रघुवंशी