श्रीराम मंदिर उभारणीसाठी सारंगखेडा येथे मदतनिधी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:17+5:302021-02-14T04:29:17+5:30

अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी सारंगखेडा येथून ग्रामस्थांनी दोन लाख २५ हजार रुपयांचा निधी संकलित केला. त्यानिमित्त येथील हनुमान मंदिरात ...

Fundraising for construction of Shriram Temple at Sarangkheda | श्रीराम मंदिर उभारणीसाठी सारंगखेडा येथे मदतनिधी संकलन

श्रीराम मंदिर उभारणीसाठी सारंगखेडा येथे मदतनिधी संकलन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी सारंगखेडा येथून ग्रामस्थांनी दोन लाख २५ हजार रुपयांचा निधी संकलित केला. त्यानिमित्त येथील हनुमान मंदिरात महाआरती झाली. त्यानंतर देणगी स्वीकारणे सुरू झाले. दात्यांनी देणगीचे धनादेश अजय शर्मा यांच्याकडे सुपुर्द केले. राम मंदिर ट्रस्ट, सारंगखेडा यांच्याकडून एक लाख रुपये, देवेंद्रसिंग रावल यांच्याकडून २१ हजार ५०० रुपये, जयपालसिंह रावल यांच्याकडून २१ हजार, डॉ. सुभाष फुलंब्रीकर यांच्याकडून ११ हजार रुपये, मुरलीधर भुता पाटील यांच्याकडून दोन हजार १०० रुपये यासह ग्रामस्थांनी दिलेला निधी, असा दोन लाख २५ हजार रुपयांचा निधी देणगी स्वरूपात संकलित करून हा निधी अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी देण्यात आला. यावेळी अजय शर्मा यांनी निधी संकलनाची माहिती दिली. डॉ. सुभाष फुलंब्रीकर यांनी प्रभू श्रीरामांचे मंदिर पूर्ण झाल्यानंतर सारंगखेडा येथून एक बस भरून आपल्या स्वखर्चाने रामभक्तांना श्रीराम मंदिर पाहण्यासाठी व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे जाहीर केले. यावेळी तुकाराम पाटील, डॉ. ओमकार पाटील, विजय पाटील, यशवंत जोशी, जगन्नाथ बडगुजर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Fundraising for construction of Shriram Temple at Sarangkheda