वाहनाचे हप्ते थकवून साडेआठ लाखाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:24 IST2020-02-05T21:24:30+5:302020-02-05T21:24:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चार चाकी वाहनाचे हप्ते भरण्याचे सांगून वाहन ताब्यात घेत त्याची परस्पर विल्हेवाट लावून आठ ...

Fraud of vehicle installments by fraud of Rs | वाहनाचे हप्ते थकवून साडेआठ लाखाची फसवणूक

वाहनाचे हप्ते थकवून साडेआठ लाखाची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चार चाकी वाहनाचे हप्ते भरण्याचे सांगून वाहन ताब्यात घेत त्याची परस्पर विल्हेवाट लावून आठ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदर्डे, ता.शहादा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदर्डे येथील दादाभाई राजाराम भिल यांच्याकडून त्यांच्याच नावावर असलेले बोलेरो वाहन गुलसिंग सुरसिंग बर्डे यांनी घेतले होते. या वाहनाचे फायनान्सचे हप्ते भरून देण्याची बोली बर्डे यांनी केली होती. परंतु वाहनाचा एकही हप्ता न भरता वाहन परस्पर दुसऱ्याला विकून टाकले. दादाभाई भिल यांना कर्जाच्या हप्त्याच्या नोटीसा येवू लागल्यावर त्यांनी तपास केला असता बर्डे यांनी एकही हप्ता भरला नाही.
शिवाय भिल यांनी भरलेले ६३ हजार २०० रुपयांचे हप्ते देखील त्यांनी विल्हेवाट लावली. त्यामुळे एकुण सात लाख ८० हजार वाहनाचे हप्ते आणि ६३ हजार २०० रुपये भरलेले हप्ते असा एकुण आठ लाख ४३ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
दादाभाई भिल यांनी फिर्याद दिल्याने गुलसिंग बर्डे यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश वाघ करीत आहे.

Web Title: Fraud of vehicle installments by fraud of Rs