दोन लाख ६५ हजारात एकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:54 IST2020-08-13T21:53:59+5:302020-08-13T21:54:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोबाईलवर मेसेज टाकून शहादा येथील एकाची दोन लाख ६५ हजारात आॅनलाईन फसवणूक केल्याची घटना ...

Fraud of one in two lakh 65 thousand | दोन लाख ६५ हजारात एकाची फसवणूक

दोन लाख ६५ हजारात एकाची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोबाईलवर मेसेज टाकून शहादा येथील एकाची दोन लाख ६५ हजारात आॅनलाईन फसवणूक केल्याची घटना शहादा येथे उघडकीस आली. शहादा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील सागर शरद भावसार या तरुण व्यापाऱ्यास आॅनलाईन गंडा घालण्यात आला. त्यांचे शहाद्यात बिल्डींग मेटेरियल सप्लायर्स नावाचे दुकान आहे. २६ जून ते ६ आॅगस्ट या दरम्यान सागर भावसार यांना फॉरेक्स फॅक्टरी मधील अनोळखी व्यक्तींनी वेळोवेळी संदेश पाठविले. त्या आधारे त्यांच्या स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या शाखेतून आॅनलाईन दोन लाख ६४ हजार ९५३ रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी सागर भावसार यांच्या फिर्यादीवरून फॉरेक्स फॅक्टरीमधील अनोळखी व्यक्तींनी दोन लाख ६४ हजार ९५३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील करीत आहे.
दरम्यान, आॅनलाईन फसवणुकीचे प्र्रकार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांनी फेक मेसेज व कॉलवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Fraud of one in two lakh 65 thousand