शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
2
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
3
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
4
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
5
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
6
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
7
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
8
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
9
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
10
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
11
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
12
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
13
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
14
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
15
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
16
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
17
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
18
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
19
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
20
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहणारे चार ट्रॅक्टर जप्त साडेपाच लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील तापी गोमाई नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील तापी गोमाई नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागामार्फत जप्त करण्यात आल्या असून प्रत्येकी एक लाख १५ हजार रुपये असा एकूण पाच लाख ६० हजार रुपये आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्यांविरोधात तालुक्यात महसूल विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.शनिवारी रात्रीच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात टेंभेतर्फे सारंगखेडा येथे दोन वाळू ट्रॅक्टर तसेच गोमाई नदीपात्रात डामरखेडा येथे दोन असे एकूण चार वाळू तस्करी करणाºया ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागाने जप्त केल्या आहेत. तालुक्यात शासनामार्फत वाळू घाटाचा अधिकृत लिलाव झालेला नसताना अनेक वाळूतस्करांनी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील तापी व गोमाई या प्रमुख नद्यांसह इतर नदीपात्रातून वाळू तस्करी सुरू ठेवली आहे. वाळू तस्करांच्या या कारणांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महसूल विभागाने वाळू प्रकरण विरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महसूल विभागाच्या पथकात तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, अव्वल कारकून प्रदीप पाटील, तलाठी लक्ष्मण कोळी, पोलीस कर्मचारी होते. कारवाईनंतर ही वाहने सारंगखेडा येथील पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली. या कारवाईदरम्यान पथकाला दोन बेनामी दुचाकी आढळून आल्या असून त्यांची चौकशी करून शोध घेण्याबाबत व कारवाई करण्याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले आहे.दोन्ही नदीपात्रात महसूल विभागाचे विशेष पथक रात्रीच्या सुमारास कार्यरत करण्यात आले होते. या पथकाने सुमारे सहा ते सात किलोमीटर रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरवर बसून फिल्मी स्टाईलने वाळू तस्करांची घटनास्थळी जप्ती केली आहे. प्रशासनातर्फे अचानक कारवाई सुरू झाल्याने नदीपात्रातील अनेक ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला. टेंभातर्फे सारंगखेडा व डामरखेडा येथील कारवाईत चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. प्रत्येक ट्रॅक्टर मालकाला सुमारे एक लाख १५ हजार रकमेच्या दंडाच्या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.