शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात चार दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील मलिक कॉम्प्लेक्समधील चार दुकानांना शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत साधारण साडेअकरा लागांचे नुकसान झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील मलिक कॉम्प्लेक्समधील चार दुकानांना शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत साधारण साडेअकरा लागांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. बडरी कॉलनीतील नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळून आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात आले.पोलीस सूत्रानुसार, रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील बडरी कॉलनीतील मलिक कॉम्प्लेक्समधील मलक स्पेअर पार्टस् या दुकानाला विजेच्या शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण करत त्याच्या शेजारील अजेरीचा हार्डवेअर, जुनेर मोबाईल, मोनाली कोल्ड्रीक्स या तीन दुकानांनाही आग लागून त्यातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. हा प्रकार गल्लीतील रूणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुकानाचे मालक सिकीब मलक यांना उठविले. त्यांनी नगरसेवक अमानुद्दीन शेख यांना कळविले. त्यांनी थेट नगरपालिकेला कळविल्यानंतर नगरपालिकेच्या अग्नीश्मन बंब तेथे पोहोचला. गल्लीतील नागरीक व पालिकेच्या बंबामुळे आगीवर पाण्याचा वर्षाव करून लवकर आग विझविण्यात यश आले. साहजिकच यामुळे व्यापारी संकुलातील इतर दुकानांचेही नुकसान टळले. फौजदार ज्ञानेश्वर पाऊले हे आपल्या पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांच्या पंचनाम्यानुसार मलक सिकीब, सुलतान मलक यांचे स्पेअर पार्टस् दुकानाचे चार लाख, अनवर अलीखान यांचे हार्डवेअरचे साडे सहा लाख, जुनेद शेख मनवर यांचे मोबाईल रिपेअरिंगचे २० हजार व योगेश सुभाष शर्मा यांचे कोल्ड्रींक्सचे एक लाख असा एकूण साडे ११ हजार रूग्णांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सीकीब मलक यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसात अग्नी उपद्रवाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.कॉ.दिलीप जगदाळे करीत आहे. या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आहे.