शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

प्रकाशा येेथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार लाखा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 1:16 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रकाशा ता. शहादा येथील संगमेश्वर रस्त्यावर गणपती मंदिराच्या मागे नदीकाठी काटेरी झुडूपात सुरु असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रकाशा ता. शहादा येथील संगमेश्वर रस्त्यावर गणपती मंदिराच्या मागे नदीकाठी काटेरी झुडूपात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहादा पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकाशा येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहादा पोलीसांना मिळाली होती. माहितीवरून पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकत  किशोर उर्फ ठेंगा कमु पाडवी, अमिताभ येण्या भिल, सुरेश धोंडू भोई, दुर्या मंगल ठाकरे, देवसिंग रामचंद्र भिल, सजन सुरजमल जैन, राजू शिवाजी ठाकरे, रविंद्र तुंबा सावळे, दिनेश सुकराम ठाकरे, संजीव उद्धव नाईक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ मोटारसायकली, १७ हजार ४०० रुपयांचे मोबाईल तसेच १५ हजार २२० रुपये रोख असा एकूण ४ लाख  २ हजार ६२० रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत पोलीस नाईक मणिलाल दिलीप पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी, पोलीस नाईक माणिलाल पाडवी,सुनील पाडवी, मुकेश राठोड, प्रताप गिरासे, योगेश माळी, पंकज जिरेमाळी, होमगार्ड तुषार पाटील यांनी केली.शहादा तालुक्यात तीन महिन्यांपासून सलग जुगार अड्ड्यांवर धाडी सुरु असून दीड महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई असल्याची माहिती देण्यात आली आहे.