शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसात अडीच हजार हेक्टरचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सारंगखेडा ता़ शहादा येथे जिल्ह्यातील सर्व प्रशासनातील अधिका:यांची आढावा बैठक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सारंगखेडा ता़ शहादा येथे जिल्ह्यातील सर्व प्रशासनातील अधिका:यांची आढावा बैठक रविवारी घेली होती़ बैठकीत त्यांनी शुक्रवारी पंचनामे पूर्ण करुन शनिवारी चावडी वाचन करण्याचे आदेश दिले होत़े परंतू चार दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यात केवळ अडीच हजार हेक्टर क्षेत्रातच पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आह़े           कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या अधिका:यांनी संयुक्तपणे करावयाच्या या पंचनाम्यांना गती मिळत नसल्याने शेतक:यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े विशेष म्हणजे शासनाने कोरड, बागायती, बहुवार्षिक अशा कोणत्याही पिकाचे नुकसान झाल्यास सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना अनेक ठिकाणी केवळ धान्य पिकांचे पंचनामे आधी करुन कारवाई केली जात असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आह़े पथकांकडून कापसात नत्र असल्याने पाने लाल झाली, कीडरोग आणि पावसाची मोजणी करुन पंचनामे केले जात असल्याचे शेतक:यांनी सांगितले आह़े परंतू अवकाळीमुळे नुकसान झाल्याने नुकसान या एकाच व्याख्येत पंचनामे होणे गरजेचे असताना तशा प्रकारची कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये गेलेल्या पथकांना शेतक:यांचा या रोषाचा सामना करावा लागला असून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े ब:याच ठिकाणी अद्यापही पंचनाम्यांचे पथक पोहोचलेले नसल्याने शेतक:यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आह़े 

महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांनी आतार्पयत जिल्ह्यातील 2 हजार 437 हेक्टरवर पंचनामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े एकूण 4 हजार 916 शेतक:यांच्या मालकीच्या क्षेत्रात कापसासह खरीप धान्य व तेलबिया पिकांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात सर्व तालुक्यात नुकसानीची माहिती मिळत असल्याने तालुकास्तरावरुन तहसीलदार दरदिवशी सूचना करत असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

आसाणे परिसरात पंचनाम्यांना टाळाटाळ 

नंदुरबार : तालुक्यातील आसाणे, घोटाणे, रनाळे परिसरातील शेतक:यांना अवकाळीचा फटका बसला आह़े या ठिकाणी पंचनामे करण्यास टाळटाळ होत असल्याची तक्रार शेतक:यांनी निवेदनाद्वारे केली आह़े तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले आह़े निवेदनात आसाणे, घोटाणे, रनाळे परिसरातील गावांमध्ये यंदा पावसाळ्यात अतीवृष्टी झाली आह़े गेल्या आठवडय़ातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतक:यांची पिके पूर्णपणे खराब झाली आहेत़ यातून काही शेतक:यांनी कापूस आणि इतर पिकांचा विमा करुन घेतला आह़े अवकाळीचे नुकसान झाल्यानंतर शेतक:यांनी टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करुन माहिती देण्याचा प्रयत्न केल्यानंतर कोणत्याही विमा प्रतिनिधीने त्यांची मदत केलेली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधीने येऊन पाहणी करणे गरजेचे असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े शेतशिवारात अवकाळीमुळे पडून असलेल्या पिकात अळ्या पडण्यासह धान्यात कोंब फुटले आहेत़ यामुळे पंचनामे करण्याची मागणी आह़े पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई देण्याची कारवाई न झाल्यास या गावांमधील शेतकरी आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आल आह़े निवेदनावर किसन रुपचंद पाटील, समाधान किसन पाटील, रविंद्र पाटील, विजय पाटील, किरण पाटील यांच्यासह शेतक:यांच्या सह्या आहेत