आणखी पाच जणांना दिला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:14 IST2020-06-24T12:14:40+5:302020-06-24T12:14:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन कारवाई करत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातून आणखी पाच ...

Five others were discharged | आणखी पाच जणांना दिला डिस्चार्ज

आणखी पाच जणांना दिला डिस्चार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन कारवाई करत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातून आणखी पाच जणांना घरी सोडण्यात आले़ यातील तिघे नंदुरबार तर मोलगी आणि रनाळे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे़
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील जामा मस्जिद भागातील तिघे, मोलगी ता़ अक्कलकुवा व रनाळे ता़ नंदुरबार येथील प्रत्येकी अशा पाच जणांचे दुसऱ्या फेरीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला़ मंगळवारी रात्री उशिरा त्यांना विविध सूचना करत घराकडे रवाना करण्यात आले़ पाच जणांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातून कोरोनामुक्त झालेल्या संख्या ५२ झाली आहे़ जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ३० जणांवर उपचार सुरु आहेत़
मंगळवारी २३ जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले होते़ दरम्यान २५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी धुळे पाठवण्यात आले असून अद्यापही ४५ जणांचे स्वॅब रिपोर्टची प्रतिक्षा आहे़ त्याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे़

Web Title: Five others were discharged