शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

कुंभारपाडा येथील आगीत साडेसहा लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:57 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  नवापूर तालुक्यातील कुंभारपाडा येथील एका दुमजली कौलारू लाकडी घराला लागलेल्या आगीत रेशन दुकानासह गुरांचा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी :  नवापूर तालुक्यातील कुंभारपाडा येथील एका दुमजली कौलारू लाकडी घराला लागलेल्या आगीत रेशन दुकानासह गुरांचा गोठा यांना लागलेल्या आगीत सागवानी लाकूड, धान्य व इतर साहित्यासह एकूण सहा लाख ६४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.नवापूर तालुक्यातील कुंभारपाडा येथे नवापूर पंचायत समितीचे माजी सभापती व धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक रतिलाल होन्या गावीत यांच्या राहत्या घराच्या बाजूस असलेल्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान व गुरांचा गोठा तसेच  वरच्या मजल्यावर चाऱ्याची साठवणूक  करून ठेवण्यात आली होती. या घरास मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. हे दुमजली घर लाकडी व कौलारू होते. तसेच वरच्या मजल्यावर गुरांसाठी चारा भरलेला होता. आग लागल्यामुळे चारा व घराचे लाकडे यांनी पेट घेतल्याने क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत रतिलाल गावीत यांचे रेशन दुकान, गुरांचा गोठा तसेच चारा व संसारोपयोगी साहित्य जळाले. हे घर सागवानी लाकडापासून बांधण्यात आलेले होते. त्यामुळे सागवानी लाकडाचे खांब, दरवाजे, लाकडी भांडे, लाकडी फळी, कौले तसेच साळ (भात), दादर, ज्वारी असे धान्यासह रेशन दुकानातील  साहित्य या आगीने लपाट्यात घेत सर्व साहित्य जळून राख झाले. हे सर्व साहित्य व साधने मिळून सहा लाख ६४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले, असे तलाठी नरेंद्र महाले यांनी तहसीलदार नवापूर यांच्याकडे सादर केलेल्या पंचनाम्यात उल्लेख केलेला आहे. नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले व येथील तलाठी यांना नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगितले.