खांडबाऱ्यातील आगीत तीन दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:40 IST2019-12-16T12:40:20+5:302019-12-16T12:40:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खांडबारा, ता.नवापूर येथील रेल्वे स्थानक परिसरातील भाजीपाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीत भाजीपाला विक्रेत्यांची तीन दुकाने ...

Fire burns three shops in Khandrabari | खांडबाऱ्यातील आगीत तीन दुकाने जळून खाक

खांडबाऱ्यातील आगीत तीन दुकाने जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खांडबारा, ता.नवापूर येथील रेल्वे स्थानक परिसरातील भाजीपाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीत भाजीपाला विक्रेत्यांची तीन दुकाने व तीन लॉºया जळून खाक झाल्या. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पोलिसात नोंद करण्यात आली.
शुक्रवारी रात्री ११ वाजता थंडीच्या बचावापासून काही व्यक्तींनी भाजीपाला परिसरात पडलेला कचरा गोळा करून शेकोटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हवेने ज्वाला उसळून दुकानावरील छताच्या कापडाला आग लागल्याने थोड्याच वेळात या आगीने दुकानांचे शेड जळून खाक झाले. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले.
नेमकी शेकोटी कोणी पेटविली होती याचा तपास लावण्यात येत आहे. दरम्यान ही आग वेळीच आगविझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
गावातील आसिफ पठाण, विशाल चौधरी, कन्नु शर्मा, देवासिंग जगताप, सादीक पठाण, अनिल शर्मा, संदीप वायकर यांच्यासह स्थानिक तरूणांनी व हवालदार सुरेश चौरे, प्रविण अहिरे, होमगार्ड वळवी यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Fire burns three shops in Khandrabari