पोल्ट्री फाॅर्म व्यवसायासाठी आदिवासी विकास विभागाकडून अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:02+5:302021-01-20T04:32:02+5:30

आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले व त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विविध योजना राबविल्या ...

Financial assistance from Tribal Development Department for Poultry Farm Business | पोल्ट्री फाॅर्म व्यवसायासाठी आदिवासी विकास विभागाकडून अर्थसहाय्य

पोल्ट्री फाॅर्म व्यवसायासाठी आदिवासी विकास विभागाकडून अर्थसहाय्य

Next

आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले व त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत आदिवासी भागामध्ये व्यावसायिक पद्धतीने पोल्ट्री फाॅर्म व्यवसायासाठी आदिवासी स्वयंसहाय्यता पुरूष व महिला बचत गटांना अर्थसहाय्य देणे, आदिवासी स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना शेळी गटाचा पुरवठा करणे, (प्रति युनिट १० शेळी व एक बोकड) याचा लाभ तळोदा प्रकल्प कार्यालायकडून आदिवासी बांधवांना देण्यात येणार आहे.

या मंजूर योजनेंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अथवा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे नोंदणीकृत व सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटांनी २० ते ३१ जानेवारी २०२१ रोजी पर्यंत शासकीय सुट्टी वगळता इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांचे आवेदन पत्र किंवा प्रस्ताव तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थी बचत गटांची निवड ही योजनेच्या निर्गमित मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून करण्यात येणार असल्याचे प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा यांनी कळविले आहे.

Web Title: Financial assistance from Tribal Development Department for Poultry Farm Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.