वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:21 PM2020-02-17T12:21:41+5:302020-02-17T12:21:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही ...

Fear of growing wildlife | वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने भीती

वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने भीती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील शेतांमध्ये बिबट्यांसह वानरांच्या कळपाने धाव घेतल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ब्राह्मणपुरीकडून गणपती मंदिरमार्गे सुलवाडेकडे जाणाºया रस्त्यावर तीन बिबटे ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. मोटारसायकलचा लाईट चमकल्याने तिन्ही बिबटे जवळ असलेल्या केळीच्या बागेत पळाले. तेथून भयभीत झालेले तुषार मराठे, निखिल शिंदे व रोहित मराठे यांनी गावात येऊन ग्रामस्थांना याबाबत सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटनाही घडली होती. या बिबट्यांच्या वास्तव्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
दरम्यान, ब्राह्मणपुरी परिसरात वानरांची टोळी आली आहे. या टोळीतील वानरे गाव वस्तीत फिरकत असल्याने त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या त्यांच्याकडून नुकसान होत नसले तरी त्यांचा उपद्रव वाढण्याआधी बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Web Title: Fear of growing wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.