शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या वास्तव्याने शेतमजुरांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : वैजाली रस्त्यावर प्रकाशा येथील शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतांमध्ये बिबट्याचा वावर असून त्याचे पायाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : वैजाली रस्त्यावर प्रकाशा येथील शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतांमध्ये बिबट्याचा वावर असून त्याचे पायाचे ठसे आढळून आल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन भीतीचे वातावरण दूर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा-वैजाली रस्त्यावर गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गावातील देवेंद्र वसंत पाटील यांच्या शेताजवळ बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजनेची जुनी पाण्याची टाकी व इमारत आहे. त्याठिकाणी बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी सकाळी बिबट्याच्या पायाचे ठसे शेतात दिसून आले. परशराम सदाशिव पाटील, अशोक सुदाम पाटील, रमणलाल परशराम पाटील, रमेश पाटील, सुनील संभू पाटील, देवेंद्र वसंत पाटील आदी शेतकºयांच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात आले. सुनील संभू पाटील यांच्या पेरणी न केलेल्या शेतामध्ये या बिबट्याचे पायाचे ठसे स्पष्ट दिसून आले. याठिकाणी बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजनेच्या पडक्या अवस्थेत पाण्याची टाकी, रखवालदाराची खोली आहे. त्याठिकाणी काटेरी झाडे आहेत. म्हणून त्याठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आहे. तसेच जवळच बांबूचे शेत आहे त्या शेतामध्ये त्याचा वावर असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. वनविभागाने येथे भेट देऊन बिबट्याच्या पायाचे ठसे पाहून त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारण आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. पेरणी व लागवड केलेल्या पिकांची आंतरमशागतीचे काम करणे गरजेचे आहे. मात्र बिबट्याचा वावर असल्याने भीतीमुळे मजूर काम करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रकाशा शेतकरी संघटनेकडून केली जात आहे.गेल्या महिन्यात तळोदा तालुक्यात हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका शेतकºयाला जीव गमवावा लागला तर तीन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे शेतमजुरांमध्ये हिंस्त्र प्राण्यांबद्दल प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेतीकामांवर होऊन वेळेवर पिकांची मशागत न झाल्यास उत्पन्नातही घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.