शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माघारीसाठी अनेकांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डमी, अपक्ष आणि पक्षाचा अधिकृत उमेदवाराचे मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी आता विनवण्या, मनधरणी करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डमी, अपक्ष आणि पक्षाचा अधिकृत उमेदवाराचे मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी आता विनवण्या, मनधरणी करीत आश्वासनांची खैरात सुरू झाली आहे. ३० तारखेपर्यंत माघारीची मुदत असल्यामुळे त्याच्या आत संबधितांना समजविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, माघारीसाठी दबाव येणार हे लक्षात घेता अनेक उमेदवार व अपक्ष हे दोन दिवसांपासून नॉट रिचबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात काही अपवाद वगळता मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात हौशी मंडळींचा देखील मोठा भरणा आहे. सुदैवाने अशा मंडळींचे नामांकन अर्ज छाननीत वैध ठरल्याने आता त्यांना जरा जास्तच भाव आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा डोकेदुखी ठरणाºया उमेदवारांना माघारीसाठी प्रयत्न करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.नात्यागोत्याचा आधारअपक्ष व इतर उमेदवारांच्या माघारीसाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार आता नातेगोत्याचाही आधार घेत आहेत. नात्यामधील इतर मंडळींना वरिष्ठ व आदर असलेल्या मंडळींना अशा लोकांकडे संबधीत उमेदवाराच्या मनधरणीसाठी पाठविले जात आहे.यासाठी नातेवाईकांच्या बैठकांचे सत्र देखील सुरू आहे. त्यात चर्चा करून माघारीसाठी विनवण्या केल्या जात आहेत तर कुठे दबाव आणला जात आहे. नाहीच ऐकले तर पाहून घेण्याची भाषा देखील नात्यागोत्यातील बैठकांमधून दिसून येत आहे. येत्या काही दिवसात अर्थात रविवारपर्यंत या सर्व घडामोडींना आणखी वेग येणार आहे.राजकीय दडपणहीमाघारीसाठी राजकीय दडपण देखील टाकले जात आहे. ज्यांनी ज्या पक्षाकडून उमेदवारी मागितली ती मिळाली नाही तर लागलीच दुसºया पक्षाकडून उमेदवारी घेत उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांची माघार कशी होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.यापुढील काळात राजकीय आश्वासने देखील दिली जात आहेत. ग्रामपंचायतीत संधी देण्यासोबतच इतर माध्यमही वापरली जात आहेत. काहींना जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कामे उपलब्ध करून देण्यासह इतर माध्यमातून संधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. अर्थात संबधीतांची सत्ता आली तर ते शक्य आहे. सुरुवातीला राजकीय पदाधिकारी शब्द टाकत आहेत परंतु त्यांचेही ऐकले नाही तर थेट नेत्यांकडून संबधीतांना सांगितले जात आहे. त्यासाठी नेत्याच्या कार्यालयात संबधीताला नेणे किंवा गावातच प्रतिष्ठीताकडे बैठक बोलावून अशा उमेदवारांना समजविण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.बेरीज-वजाबाकीकाही कारणांनी संबधीत उमेदवारांनी माघार घेतलीच नाही तर त्यातून आपल्याला किती तोटा होऊ शकतो, किती मते विरोधात जावू शकतात याचे गणितही लावले जात आहे. जर विजयाची खात्री असेल तर असे प्रमुख उमेदवार संबधीतांना माघारीसाठी फारसा प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे.याउलट ज्या अपक्ष किंवा बंडखोर उमेदवारामुळे कसा फायदा होईल, किती मतांचा फरक पडेल याचीही चाचपणी केली जात आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना मुद्दाम रिंगणात राहू दिले जात आहे. त्यासाठी त्याला रसद देखील पुरविली जात आहे. त्याने माघार घेवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.एकुणच अर्ज छाननी नंतर आता माघारीकडे लक्ष लागून आहे. छाननीनंतर अनेक गट व गणातील लढती स्पष्ट झालेल्या आहेत. तरीही माघारीनंतर आणखी चित्र स्पष्ट होणार आहे. अनेकांना सोप्या तर काहींना कठीण लढतींना देखील सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत काय काय घडामोडी होतात, कोण-कोण माघार घेतो, कुणाची उमेदवारी आणि बंडखोरी कुणाला फायद्याची आणि पथ्यावर पडणारी ठरते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.माघारीची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस मोठ्या घडामोडी ग्रामिण भागात होणार असल्याचे चित्र आहे.काही प्रमुख उमेदवारांनीच स्वत: काही अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा फायदा व तोटा हे येणाºया काळातच दिसणार आहे.भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी यांनी जास्तीत जास्त मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. अपक्षांचाही भरणा भरपूर गट व गणात दिसून येत आहे.माघारीनंतर प्रचारासाठी अवघे सात दिवस मिळणार असल्यामुळे अनेकांनी आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे.