शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आपले नाव आधार प्रमाणिकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाले असून आधार प्रमाणिकरण तातडीने करुन घ्यावे, ...

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आपले नाव आधार प्रमाणिकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाले असून आधार प्रमाणिकरण तातडीने करुन घ्यावे, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा संदेश शेतकऱ्यांना मोबाइलवर शासनाच्या वतीने पाठविले जात आहे. परंतु अद्यापही हा संदेश काही शेतकऱ्यांच्या मोबाइलवर आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आपले सेवा केंद्र किंवा बँक शाखेत जाऊन विचारणा करीत आहेत. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांना असे मेसेज आले आहेत ते बँकेत गेल्यानंतर त्यांना बँकेचे अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नाहीत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तर वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थित आहे. अद्यापपर्यंत एकाही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या योजनेपासून अद्यापही बरेच शेतकरी वंचित असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी भावना व्यक्त होत आहे.

अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नसून एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचे नावे बँकेत रक्कम आलेली नाही किंवा मेसेजही देण्यात आलेला नाही. संबंधितांनी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी व कर्जमुक्त करण्यात यावे.

-डॉ.किशोर पाटील, प्रदेश सदस्य, भाजप किसान मोर्चा