शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीबाबत शेतक:यांच्या आशा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क असलोद :  दुधखेडा ता.शहादा येथील धरणात यंदा पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला असून ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद :  दुधखेडा ता.शहादा येथील धरणात यंदा पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला असून ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. त्याचबरोबर  परिसरातील लहान-मोठे तलावही पूर्ण भरले आहेत. त्यामुळे शेतक:यांच्या रब्बी हंगामाबाबत आशा उंचावल्या आहेत.यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने दुधखेडासह परिसरातील सर्वच तलाव व धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे परिसरातील शेत शिवारासह मंदाणे, असलोद, न्यू असलोद येथील कोरडवाहू शेतक:यांच्या जमिनीस संजीवनी मिळाली आहे. दुधखेडा धरणाच्या पाण्यातून खरीप व रब्बी हंगाम मिळून एक हजार एकरपेक्षा जास्त जमीन बागायत केली जाते. या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येणार असल्याने रब्बी हंगाम यंदा चांगला येईल, अशी आशा शेतक:यांकडून व्यक्त केली जात   आहे.दुधखेडा धरणातील पाण्याचा पुरेपूर उपयोग शेती सिंचनासाठी होण्यासाठी साठलेल्या पाण्याच्या वापरासंदर्भात नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही शेतक:यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतक:यांना लाभ मिळवून देण्याची गरज आहे. यंदाच्या खरीप हंगामात उशिरा का होईना परंतु पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी-नाल्यांसह विहिरी व कुपनलिकांच्या जलसाठय़ातही वाढ झाली आहे. तसेच लोंढरे लघुप्रकल्पासह शहाणा, लंगडी, लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या पाण्यामुळे परिसरातील शेतशिवार बागायत होणार आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठय़ाचे पाणी वापरासंदर्भात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

शहादा तालुक्यातील दुधखेडा येथील धरणात यंदा पाण्याचा साठा पूर्ण क्षमतेने झाला असून शेतक:यांच्या रब्बी हंगामाबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत. धरणातील पाणीसाठय़ामुळे या परिसरातील विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळीही वाढली आहे. या धरणातून शेती सिंचनासाठी पाणी देण्यासाठी पाटचा:या तयार केल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत या पाटचा:यांची दूरवस्था झाली आहे. खरीप हंगाम संपल्यानंतर धरणातील पाण्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतील. त्यामुळे या धरणातील लाभक्षेत्रातील रब्बीतील पिकांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी या धरणाच्या पाटचा:यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.