शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत प्रकाशा येथील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यात सोयाबीन, कापूस, ज्वारी (दादर), मका, मूग, उडीद आदी ...

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत प्रकाशा येथील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यात सोयाबीन, कापूस, ज्वारी (दादर), मका, मूग, उडीद आदी पिकांचा पीकविमा काढला होता. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे संबंधित कंपनीच्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी पीक खराब झाले, शेतात पाण्याचे डबके साचले त्या भागात जाऊन ऑनलाइन फोटो काढले व पंचनामे केले होते. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पंचनामे करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्याची पोहोच पावतीही शेतकऱ्यांकडे आहे. पंचनामे करून चार महिने झाले. मात्र अद्यापही संबंधित शेतकर्‍यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. कृषी विभागाने याबाबत दखल घेऊन ज्या कंपनीने विमा काढला आहे त्यांना योग्य त्या सूचना देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही काही शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. मात्र खरीप हंगामामध्ये नुकसान होऊनही त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. आता तर रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी ( दादर) या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविमा कंपनी व राष्ट्रीयीकृत बँकांनी नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईची रक्कम देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.