शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकांनी कर्ज वितरणसाठी वकिलांची संख्या वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

ड पत्रकासाठीही मारावे लागतात हेलपाटे शेतकऱ्यांना आपल्या कृषी कर्ज करीता बँकांच्या बोजा चढविताना संबंधित क्षेत्राच्या सातबारा बरोबरच ३० वर्षांच्या ...

ड पत्रकासाठीही मारावे लागतात हेलपाटे

शेतकऱ्यांना आपल्या कृषी कर्ज करीता बँकांच्या बोजा चढविताना संबंधित क्षेत्राच्या सातबारा बरोबरच ३० वर्षांच्या मोदी व ड पत्रकाची आवश्यकता असते. संपत्तीचे दस्तावेज महसूल प्रशासनाच्या रेकॉर्ड रूममधून मिळत असतात. दस्तावेज मिळवताना शेतकऱ्यांना संबंधितांकडे हेलपाटे मारावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचा आरोप आहे. मागितलेले दस्तावेज कधीच एक,दोन दिवसात मिळत नाही, त्यासाठी सात,आठ दिवस सारख्या चकरा मारत असतात. साहजिकच शेतकऱ्यांची दमछाक होत असते. कर्जाची ही प्रक्रियासाठी लागणारी कागदपत्रांच्या कटकटीमुळे नाईलाजास्तव शेतकरी बँकांचे स्वतः कर्ज नाकारून खासगी सावकाराचे दरवाजे ठोठावतात. स्थानिक महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांची कटकट थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात व संबधितांना सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

बँकांकडून कृषी कर्ज काढताना आधिच मोठी प्रक्रिया करावी लागते. त्यातच बोजा चढवण्याकरिता वकिलांच्या प्रमाणपत्राकरिता खूपच फिरफिर करावी लागत असते. यासाठी बँकांनी एक,दोनच वकिलांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांची मोठी संख्या पाहता वकिलांची संख्याही वाढवावी.

विजय पाडवी,शेतकरी,तळोदा.

तळोदा तालुक्यात खातेदार शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे कृषी कर्ज बोजाच्या प्रक्रियेसाठी पुरेशा वकिलांची संख्या असणे आवश्यक आहे. तरीही याबाबत संबंधित प्रशासनाची चौकशी करून संख्या वाढविणेकरिता पाठपुरावा करतो.

गिरीश वाखारे,तहसीलदार तळोदा.