अटकपूर्व जामिनसाठी बनावट दस्ताऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:13 PM2019-12-16T12:13:11+5:302019-12-16T12:13:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात सादर केलेले दस्तावेज हे बनावट असल्याचे समोर आल्याने शहरातील महिलेसह दोघांविरोधात ...

Fake documents for anticipatory bail | अटकपूर्व जामिनसाठी बनावट दस्ताऐवज

अटकपूर्व जामिनसाठी बनावट दस्ताऐवज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात सादर केलेले दस्तावेज हे बनावट असल्याचे समोर आल्याने शहरातील महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेतून हा प्रकार समोर आला आहे़
धर्मिष्ठा विनोदकुमार बाफना, विनोदकुमार केवलचंद बाफना आणि अजयसिंग जयसिंग राजपूत यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ गुन्ह्यातून अटक टळण्यासाठी धर्मिष्ठा जैन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिन याचिका दाखल केली होती़ यासाठी त्यांनी सूर्यकांत भिमदास आगळे रा़ नंदुरबार यांच्यासोबत भागीदारात असलेल्या प्लॉटची कागदपत्रे दिली होती़ हा प्लॉट १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर भागीदार सूर्यकांत आगळे यांच्याकडून खरेदी केल्याचे भासवत त्यांची बनावट सही करत कागदपत्रे न्यायालयात दाखल केली होती़ साक्षीदार म्हणून राहुल राजधर निकम यांची स्वाक्षरी असल्याचे खोटे सांगून जामिन मिळणे आणि उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची फिर्याद रद्द व्हावी असे न्यायालयात म्हटले होते़ परंतू हे दस्तावेज खोटे असल्याचे समजून आल्यानंतर गुन्हा दाखल झाला़
याबाबत सूर्यकांत आगळे रा़ नंदुरबार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित धर्मिष्ठा विनोदकुमार बाफना, विनोदकुमार केवलचंद बाफना व अजयसिंग जयसिंग राजपूत यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे करत आहेत़

सहभागीदार यांच्याकडून नंदुरबार क स्तर दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ १३ डिसेंबर रोजी या संबधी सुनावणी पूर्ण करण्यात येऊन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते़

Web Title: Fake documents for anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.