शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या कोरोना टेस्टसाठी होणार कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 14:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग सरसावला असून शिक्षकांना कोरोना स्वॅब ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग सरसावला असून शिक्षकांना कोरोना स्वॅब तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्याही सुचना देण्यात आल्याने शिक्षकांची लगबग सुरू झाली आहे.           शाळा सुरू करण्यासंदर्भातचे पत्र शिक्षण विभागाने काढले आहे. त्यानुसार सर्व शाळांनी तयारीला वेग दिला आहे. एका वर्गात किती विद्यार्थी बसवावे किंवा शाळांची वेळ कशा ठेवाव्या याबाबत खलबते सुरू आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या लक्षात घेता अशा शाळांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठीचे नियोजन देखील करण्यात येत आहे. पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील किंवा कसे याबाबतही संभ्रम कायम आहे. कारण आधीच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात शाळा सुरू होत असल्यामुळे पालकांमध्ये साशंकता आहे.        दरम्यान, शाळांनी वर्ग आणि बेंच निर्जंतुकीकरण करणे, थर्मामिटर, ॲाक्सीमिटर, सॅनिटायझर उपलब्ध करण्याची लगबग सुरू केली आहे. त्यासाठी शाळांना खर्च करावा लागणार आहे. विद्यार्थी व पालकांना देखील आवश्यक त्या सुचना द्याव्या लागणार आहेत. 

तालुकास्तरावर होणार कोरोना स्वॅब संकलन...

  • जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता तालुका स्तरावर स्वॅब संकलन करण्यात येणार आहे. सर्वच शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. 
  •  २७ जानेवारीच्या आत सर्व शिक्षकांची कोरोना स्वॅब चाचणी होईल यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्याकरीता गटशिक्षणाधिकारी स्तरावर सुचना देण्यात आल्या आहेत. 
  • शाळांना दिले पत्रशिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून शिक्षकांच्या कोरोना टेस्टचे नियोजन करण्याचे सांगितले आहे. याशिवाय शाळांना देखील वर्ग सुरू करण्याच्या तयारीसाठीच्या सुचना दिल्या असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी डॅा.युनूस पठाण यांनी दिली.