शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खोदकाम वाहनधारकांसाठी जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाच्या विस्तारीकरण कामाला ब्रेक लागला असून लहान शहादे गावातील एक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाच्या विस्तारीकरण कामाला ब्रेक लागला असून लहान शहादे गावातील एक किलोमीटरचा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे़ महामार्गावर खोदलेल्या मोरीत पाणी साचून असल्याने अपघातांची भिती असून हे पाणी गावात शिरेल अशी चिंता ग्रामस्थांना आहे़जिल्ह्यातून जाणाऱ्या विसरवाडी ते सेंधवा आणि शेवाळी ते नेत्रंग या दोन महामार्गांच्या विस्तारीकरणाला मंजूरी मिळाली आहे़ यापैकी विसरवाडी ते सेंधवा या मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे़ परंतू नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान कोळदे गाव आणि लहान शहादा गावातून जाणाºया रस्त्यात मात्र विघ्न आले आहे़ लहान शहादे आरोग्य केंद्र ते गावापुढे ५०० मीटरचा रस्ता पूर्णपणे खडीने भरुन ठेवण्यात आला आहे़ यातच गावाच्या मधोमध बामडोद गावाकडून येणाºया नाल्यावर नुकतेच मोरी बांधण्याचा शोध काम करणाºया ठेकेदाराला लागला होता़ यातून सहा महिन्यांपूर्वी येथे खोदकाम पूर्ण करुन ठेवण्यात आले आहे़ परंतू बांधकाम मात्र रखडले आहे़ खोदकामामुळे वाहतूक ठप्प होवू नये यासाठी नजीकच वळणरस्ता काढला आहे़ परंतू हा वळणरस्ता आणि हे खोदकाम आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जिवघेणे ठरत आहे़ बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी पहाटे कोसळलेल्या पावसानंतर खडी व मातीच्या या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु आहे़ खोदकामामुळे नाल्याचे वहन बंद झाल्याने पावसाळ्यात हे पाणी गावात शिरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़ याबाबत तक्रार नेमकी करावी कोणाकडे असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून एमएसआरडीसी हा विभाग नेमका असतो तरी कुठे असा, प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत़ यातून जिल्हा प्रशासनानेच यावर कारवाई करण्याची मागणी आहे़एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलेपमेंट कार्पोरेशन अंतर्गत या महामार्गाचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे़ यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे़ परंतू संबधित ठेकेदार आणि एमएसआरडीचे अधिकारीच भेटत नसल्याचे लहान शहादे व कोळदे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे़ काही दिवसांपूर्वी सुरु असलेले काम आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे़ याठिकाणी असलेले साहित्यही ठेकेदाराने उचलून नेल्याची माहिती आहे़