शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : भरधाव मोटारसायकलस्वाराने ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय मुलीला  धडक देत उपचार करण्याचा बहाणा करुन पळवून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : भरधाव मोटारसायकलस्वाराने ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय मुलीला  धडक देत उपचार करण्याचा बहाणा करुन पळवून नेले होते. मंगळवारी    कढेल ता. तळोदा  फाट्याजवळ घडली होती. या घटनेला ४८ तास उलटूनही बालिका व फरार दुचास्कीस्वार अद्याप सापडलेला नाही. बालिकेला घेवून फरार झालेल्याचा पोलीसांकडून कसून शोध घेतला असून या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दरम्यान घटनेनंतर बालिकेचे वडील मोत्या जेरमा पटले. रा घाटली आग्रीपाडा यांनी गुरुवारी दुपारी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारपासून पसार असलेला व्यक्ती मिळून येत नसल्याने  पोलिसांनी तीन पथके तयार करून गठित करून बालिकेच्या जिल्हयासह शेजारील गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील विविध सीमावर्ती शहरांमध्ये तपास सुरु केला आहे.  मंगळवारी दुपारी मोड ते तळोदा रस्त्यावर कढेल  फाट्याजवळ अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देऊन बालिकेला जखमी केले व तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचे कारण सांगून सोबत घेवून गेला होता. यानंतर बराच वेळ होवूनही दुचाकीस्वार न आल्याने बालिकेच्या पालकांनी शोध सुरु केला होता. यातून त्यांनी तळोदा पोलीसांना कळवले होते.  पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी घटनेचेे गांभिर्य लक्षात घेत  बुधवार सायंकाळपासून पथकांना कामाला लावत रवाना केले होते.   पथकांचा शोध सुरु असतानाच अज्ञात मोटारसायकलस्वार आणि बालिका मिळून येत नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. 

तीन पथकांकडून शोध सुरु अज्ञात मोटारसायकलस्वाराचा शोध घेण्यासाठी शोधासाठी पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनात  तीन पथके गठीत करण्यात आली आहेत.  पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार व पोलिस उपनिरीक्षक अभय मोरे हे तिन्ही पथकांचे प्रमुख असून प्रत्येक पथकात तीन पोलिस कर्मचाऱ्यांची समावेश आहे.  या पथकांनी मध्य प्रदेश राज्यातील खेतिया, पानसेमल येथे तर गुजरात राज्यातील कुकरमुंडा,निझर, यांच्यासह अन्य ठिकाणी शोध घेतला जात आहे. सोबतच शहादा, नंदुरबार,  नवापूर, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात देखील मुलीचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.