शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रविवारीही गजबजेल आता बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह तीन शहरांमध्ये राहणारा रविवारचा जनता कर्फ्यू आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह तीन शहरांमध्ये राहणारा रविवारचा जनता कर्फ्यू आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता रविवारी देखील नियमित बाजारपेठे सुरू राहणार आहे. मिशन बिगीन अंतर्गत हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. याशिवाय रेस्टॉरंट, बार यांनाही अटी व शर्तीनुसार सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील, तथापि आॅनलाईन शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्समधील) सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या संख्येने लोक प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे किंवा कार्यक्रम प्रतिबंधीत असतील. दुकाने व मार्केट रविवारीदेखील सुरू मॉल आणि व्यावसायिक संकुल (मार्केट कॉम्प्लेक्स), दुकाने, आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील. पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील.रविवारीदेखील दुकाने, मार्केट, आस्थापना निधार्रीत वेळेत सुरू राहतील. यापूर्वी परवानगी दिलेल्या बाबी पूर्ववत सुरू राहतील.हॉटेल/रेस्टॉरंट्स सुरू५ आॅक्टोबरपासून हॉटेल्स, फूट कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार ५० टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू राहतील. या आस्थापनांसाठी पर्यटन विभागाकडून स्वतंत्र आदर्श कार्यप्रणाली देण्यात येईल, तिचे पालन करणे बंधनकारक राहील. आॅक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाºया वाहनांच्या हालचालीस जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे वेळेचे अथवा इतर बंधन असणार नाही.कामाचे व इतर सर्व ठिकाणी आणि प्रवास करताना चेहºयावर मास्क लावणे अनिवार्य आहे.