लॉकडाऊनमध्येही हातावर पोट भरणाऱ्यांचा जीवनसंघर्ष सुरूच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:25 IST2020-05-03T13:25:04+5:302020-05-03T13:25:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे काटेकोर पालन करून प्रत्येक जण जिवाच्या भीतीने घराबाहेर पडणे टाळत असताना ...

Even in lockdown, the life struggle of those who fill their hands on their hands continues ... | लॉकडाऊनमध्येही हातावर पोट भरणाऱ्यांचा जीवनसंघर्ष सुरूच...

लॉकडाऊनमध्येही हातावर पोट भरणाऱ्यांचा जीवनसंघर्ष सुरूच...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे काटेकोर पालन करून प्रत्येक जण जिवाच्या भीतीने घराबाहेर पडणे टाळत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून हातावर पोट भरणारे व शेतीकामात झोकून दिलेल्या मजुरांचा जीवनसंघर्ष मात्र सुरूच आहे. भूकेने मरण्याची जास्त भीती असल्याने हे हातकामावर जगणाऱ्यांना कोरोनाचे कोणतेच भय न बाळगता संसाराचे गाडे ओढत आहेत.
शहादा शहरातील चौफेर असलेल्या मोकळ्या पटांगणात पत्र्याच्या सहाय्याने वस्तू बनवून विकणारे, भिक्षुकी करणारे, शेतमजूर व इतर स्थलांतरित नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात. शहरात बरेच कुटुंब असे हातावरचे काम करण्यासाठी रहात आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्व नागरिक घरात आहेत. शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता नागरिकांमध्ये भीती पसरली असताना दुसरीकडे मात्र हे असे हातावर काम करणाºयांना कोरोनाचे काहीच घेणे-देणे नसल्याचे दिसते. हे मजूर, हातावर काम करणारे कुटुंबासोबत नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. हे स्थलांतरित हातावर काम असलेले मजूर शहरातील अनेक भागांमध्ये तंबू लावून राहतात. दिवसभर काही हातावरचे काम करून सायंकाळी त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था होते. मात्र लॉकडाऊन असल्याने त्यांना कोणतेच हातावरचे काम व वस्तू विकता येत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही स्वयंसेवी संस्थांकडून तात्पुरत्या जेवणाची व्यवस्था होत असली तरी पुढील काळात संसाराचा गाडा हाकण्यासाठी कोरोनाचा सामना करत संपूर्ण कुटुंब आपल्या दैनंदिन कामात लक्ष देत वस्तू तयार करीत आहेत. अशा गरजू लोकांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज भासत आहे. सामाजिक स्वयंसेवी संस्था तात्पुरत्या स्वरुपाची सोय करत असल्या तरी लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास त्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे. कदाचित याची भनक त्यांना लागल्याने ते उन्हाची आणि कोरोनाची पर्वा न करतात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम करताना दिसून येत आहेत.

Web Title: Even in lockdown, the life struggle of those who fill their hands on their hands continues ...