अखेर जखमी मोराला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 01:09 PM2020-07-13T13:09:55+5:302020-07-13T13:11:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अलिकडे धावपळीच्या युगात मानवाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाल्याने मााणसाला माणसांकडेच लक्ष द्यायला पुरेसा वेळ ...

In the end, the injured peacock got life | अखेर जखमी मोराला मिळाले जीवनदान

अखेर जखमी मोराला मिळाले जीवनदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अलिकडे धावपळीच्या युगात मानवाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाल्याने मााणसाला माणसांकडेच लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. या स्थितीत माणसाला माणूस म्हणून मदत करण्याची प्रवृत्तीही नष्ट होत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जखमी पक्ष्याची वेदना लक्षात घेऊन अक्कलकुवा येथील कार्यकर्त्यांनी जखमी मोराला जीवनदान दिल्याची घटना नुकतीच घडली.
कोरोनाच्या काळात अनेक दिवसानंतर लोकांना थोडा निवांत वेळ मिळाला. या काळात अनेकांमध्ये पशु पक्षी व निसर्गावरील प्रेमही बहरले. कोरोनाच्या संकट काळात पशु पक्षी व प्राण्यांनीही लोकांचे मनोरंजन केले व लळा लावला. असाच प्रकार अक्कलकुवा येथे झाला. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय पक्षी असलेल्या एका मोराने अक्कलकुवा शहरातील नागरिकांचे मन मोहक मनोरंजन केले. वरूण राजाच्या बरस्त्या सरीत आपला सप्तरंगी पिसारा फुलवून शहरातल्या अनेक गल्ली बोळांमधून नाचत आबाल वृद्धांचे डोळ्याचे पारणे फेडले. त्यामुळे संपूर्ण शहरात या मोराने लोकांना लळा लावला. अनेक दिवसापासून लोकांना त्याला नियमित पाहण्याची जणू सवयच झाली आहे.
मानवा प्रमाणे प्राण्यांनादेखील काही दुखापती होतात आणि त्यामुळे ते ही वेदनांनी विव्हळतात. आपल्या मनोहारी नृत्याने अनेकांना भुरळ घालणाऱ्या पक्षाच्या या नृत्य सम्राटालादेखील एका दुखापतीने ग्रासले. हा मोर जखमी अवस्थेत विव्हळत निपचित पडल्याचे संत ज्ञानेश्वर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांना दिसला. यानंतर त्यांनी ताबडतोब रवींद्र गुरव यांना मोराच्या जखमी अवस्थेची माहिती दिली. या मोराच्या पंखामध्ये खोलवर जखम झाली होती. मोराच्या जखमी अवस्थेचे गांभिर्य लक्षात घेऊन गुरव त्यांनी अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेकानंद बाळापुरे, डॉ.ज्योती बाळापुरे, सोरापाडा येथे राहत असलेले डाब येथील पशुवैद्यकीय परिचर नरेंद्र सोनवणे व गव्हाली येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.व्ही.एस. होंडे यांना माहिती देत कोटलाफळी येथे मोरावर उपचार करण्यासाठी पाचारण केले.
डॉ.विवेकानंद बाळापुरे, ज्योती बाळापुरे, पशुधन पर्यवेक्षक व्ही.एस. होंडे, परिचर नरेंद्र सोनवणे हे तातडीने कोटला फळी येथे येऊन जखमी मोरावर तातडीने उपचार व मलम पट्टी केली. तत्काळ झालेल्या उपचारांनी जखमेच्या वेदनांनी विव्हळणाºया मोराला जीवदान मिळाले. मानवावर उपचार करणारे डॉक्टर व पशुंवर उपचार करणारे डॉक्टर एकाच वेळी एका पक्ष्यावर उपचार करताना दिसले. यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय होता. एकंदरीत कोरोनाच्या संकट काळात काही ठिकाणी डॉक्टर माणसावर उपचार करत नाही. तेव्हा एकाच वेळी पक्षी व प्राण्यावर उपचार करणाºया या डॉक्टरांचे कर्तव्य व माणुसकी इतरांच्या मनाला सुखावणारी होती. या वेळी कोटला फळीतील तुषार पाडवी यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले.

Web Title: In the end, the injured peacock got life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.