ईलाही चौकात दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:28 IST2019-12-25T12:28:51+5:302019-12-25T12:28:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ईलाही चौकात दोन गटात वाद होऊन हाणामारीची घटना घडली़ याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी ...

Elahi also plays in two groups in the square | ईलाही चौकात दोन गटात हाणामारी

ईलाही चौकात दोन गटात हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील ईलाही चौकात दोन गटात वाद होऊन हाणामारीची घटना घडली़ याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे़
सुतार मोहल्ल्यातील फरीदा बानो साजिद अहमद यांची मुले व शेख मुख्तार शेख हशीद यांच्यात किरकोळ कारणावरुन शनिवारी वाद झाला होता़ सकाळी ९ वाजेच्या सुमारास झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती़ या शेख साजिद अहमद, जुबेर शेख, साजिद शेख, माजिद शेख, तौसिफ शेख गफार व दुसऱ्या गटातील आमिर व त्याची दोन मुले (पूर्ण नाव माहित नाही), अबराद शेख हाशीद, बशिर शेख कबीर, मुख्तार शेख हाशिद, बबलू (पूर्ण नाव माहित नाही) व अफसाना बी महेमूद सर्व रा़ नंदुरबार हे एकमेकांवर चालून गेले होते़ दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर काठ्या, बॅट, लोखंडी पाईप याने मारहाण करुन जखमी केले होते़ सकाळी १० वाजेपर्यंत हा हाणामारीचा प्रकार सुरु होता़ दरम्यान नागरिकांसह पोलीस पथकाने भेट दिल्यानंतर त्यांच्यातील वाद आटोक्यात आला़
घटनेत जुनेद साजीद अहमद व शेख मुख्तार शेख हशीद दोघे रा़ सुतार मोहल्ला हा जखमी झाले आहेत़
याबाबत मुख्तार शेख यांच्या फिर्यादीवरुन साजिद शेख, जुबेर शेख, साजिद शेख, जुनेद शेख, माजिद शेख, तौसिफ शेख यांच्याविरोधात तर फरीदा अहमद यांच्या फिर्यादीवरुन आमीर व त्याची दोन मुले, अबराद शेख, बशीर शेख, मुख्तार शेख, बबलू, अफसाना बी यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करत आहेत़
घटनेदरम्यान ईलाही चौकातील रिक्षाच्या काचा फोडून तोडफोडीचे प्रकार घडल्याने नागरिकांची धावपळ झाली होती़

Web Title: Elahi also plays in two groups in the square