शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारास पुन्हा त्याच ठिकाणी दुकान सुरू करण्याबाबत आठ दिवसांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

तळोदा : प्रभागातील रेशन दुकान पुन्हा त्या ठिकाणीच त्वरित सुरू करण्यासाठी संबंधित दुकानदारांस महसूल प्रशासनाने आठ दिवसांचा अल्टिमेट दिला ...

तळोदा : प्रभागातील रेशन दुकान पुन्हा त्या ठिकाणीच त्वरित सुरू करण्यासाठी संबंधित दुकानदारांस महसूल प्रशासनाने आठ दिवसांचा अल्टिमेट दिला आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुरवठा शाखेने तेथील नागरिकांच्या तक्रारींची चौकशी केली असून, आता पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तळोदा शहरातील खान्देशी गल्ली परिसरातील ग्राहकांसाठी स्वतंत्रपणे सुरू केलेली रेशन दुकाने संबंधित दुकानदाराने प्रशासनास न माहिती देता इतरत्र स्थलांतरित केली होती. साहजिकच तेथील ग्राहकांची गैरसोय झाल्यामुळे सोमवारी त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार गिरीश वाखारे यांनी तातडीने दुकानदार पिंपळे याना नोटीस बजावली होती. शिवाय पुरवठा शाखेसदेखील चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी यांनी खान्देशी गल्ली परिसरातील कार्डधारकांचे प्रत्यक्ष जबाब घेतले. तथापि काही ग्राहकच प्रत्यक्ष हजर झाले होते. सेनेचे पदाधिकारी बाहेर गेल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. या कार्ड धारकांनी नियमानुसार धान्य मिळत असल्याचे पुरवठा निरीक्षकांना सांगितले. तथापि परिसरातून दीड किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केलेले स्वतः धान्य दुकान सात, आठ दिवसांत पुन्हा येथे सुरू करण्याचा अल्टिमेटम दुकानदारांस देण्यात आला आहे. तसेच लेखी दुकानदाराने लिहून दिल्याची माहिती पुरवठा सूत्रांनी दिली. त्यामुळे हा दुकानदार केव्हा परिसरात पुन्हा दुकानं सुरू करेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महसूल प्रशासनाच्या मिळालेल्या आदेशाने सोमवारी दुपारीच प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मोजकेच शिधापत्रिका धारक आले होते. त्यांना रेशनबाबत विचारले असता माल नियमित व नियमानुसार मिळतो, असा जबाब दिला आहे. मात्र, दुकानदारांस येथे दुकान लावण्याबाबत आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

- संदीप परदेशी, पुरवठा निरीक्षक, पुरवठा शाखा, तहसील कार्यालय, तळोदा.